सोलापूर : प्रथम, द्वितीय व तृतीय तथा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या एकत्रित परीक्षा जून ते ऑगस्ट या काळात संपविण्याचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे. त्यासंदर्भात अभ्यास मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यात हा निर्णय झाला. ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याचा निर्णय मात्र झाला नाही.
सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
सोलापूर जिल्ह्यातील 101 महाविद्यालये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत. विद्यापीठासह या सर्व महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, फार्मसी, ऑर्किटेक्चर, अभियांत्रिकीसह एमए, एमएस्सी, एमकॉमचे अंदाजित 85 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जानेवारी- फेब्रुवारीत द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पार पडली. तर आता पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा तीन सत्रात सुरू आहे.
‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’ https://t.co/zaTjnlJLFU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
जवळपास 23 हजार 960 विद्यार्थ्यांची प्रथम वर्षात नोंदणी झाली आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांच्या कुटुंबातील सदस्य तथा काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत. त्यामुळे 10 ते 12 टक्के विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकलेले नाहीत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठांनी दिली. दरम्यान, जुलै- ऑगस्टमध्ये प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाची परीक्षा एकत्रित घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे, असा विश्वासही परीक्षा विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार सुरवातीला द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची तर ऑगस्टमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची तक्रार; पोलीसांकडून मारझोड, अपमान https://t.co/m3gwuXmFyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021