सोलापूर : सिध्देश्वर मार्केट यार्ड येथे व्यापारी आणि शेतकऱ्यांना पोलीसांकडून धक्काबुक्की, अरेरावी आणि अपमानास्पद वागणूक मिळत आहे. अशी तक्रार आज व्यापाऱ्यांनी एकत्रीत येवून बाजार समितीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांकडे केली. तसेच येत्या सोमवारपासून बाजार समितीतील सर्व घाऊक व्यवहार आठवडाभर बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे यांना अरेरावीची भाषा पोलिसांकडून केली जात असल्याची तक्रार शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज https://t.co/RWn7XID24C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, गाडीवर डबलसीट जाणे, गर्दी करणे यासह इतर कारणामुळे पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे. परंतु आज गुरुवारी सकाळच्या दरम्यान भुसार बाजारांमध्ये आपला शेतमाल व्यापाऱ्यांना दाखवण्यासाठी एका गाडीवर दोन शेतकरी म्हणजेच डबलसीट जात होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवून कारवाई केली. त्यावेळी एका अडत व्यापारी पोलिसांना विनंती केली की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. काय कारवाई करायचे असेल तर नियमाप्रमाणे करा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका असे सांगितले असता संबंधित व्यापाऱ्याला देखील पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे हे देखील त्या प्रसंगी आले असता त्यांना देखील तू कोण आहेस, तुझा काय संबंध आहे, तुम्हाला कोणाला सांगायचं ते सांगा असे अरेरावीची भाषा करण्यात आले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार https://t.co/UfhHZtCIYA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या अशा जाचाला कंटाळून आम्ही सोमवारी २४ मे पासून भुसार बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अशा घटनांमुळे आतापासूनच आम्ही भुसार बाजार पूर्णपणे बंद करणार असल्याचे याप्रसंगी व्यापाऱ्याने सांगितले.
आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारात उभे असलेले पोलीस कसा त्रास देतात या विषयी व्यथा मांडताना व्यापारी म्हणजे गुन्हेगार नाही असं सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त https://t.co/ZlsFohB30p
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
अधिकारी तोंडावर तुम्ही सर्व व्यापारी लुटारु आहात असे म्हणतात अशी टिप्पणीही करतात. शेतकऱ्यांनाही मारहाण करुन त्यांची वाहनं जप्त केली जात आहेत. यामुळं व्यापारावर परिणाम होत आहे असं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे. अपमानास्पद वागणूक व होणारी दंडात्मक कारवाई याच्या निषेधार्थ व्यापार बंद ठेवणं हा पर्याय आम्ही निवडला आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. घाऊक व्यापार बंद झाल्यास शहरातील किरकोळ विक्रेत्यांना माल मिळणं मुश्कील झाले आहे.
“शेतकरी असो की व्यापारी यांना मारहाण करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. घडलेल्या घटने वेळी मी नव्हतो परंतु असे करणे चुकीचे आहे. पोलिसांकडून दादागिरी आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जर मारहाण होत असेल तर व्यापार पूर्णपणे बंद ठेवू”
प्रभाकर विभुते, अध्यक्ष भुसार व्यापार संघ
रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक, गिधाडे झालीत… (ब्लॉग)https://t.co/gppXOSWCid
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021