नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातसाठी एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं. तसेच वादळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.
गुजरात, दीव-दमणचं तौक्ते वादळात मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित होते. गुजरात आणि दीवच्या हवाई पाहणीनंतर मोदींनी अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तीत नुकसानीचा आढावा घेतला.पाहणीनंतर मोदी यांनी गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना 50 हजाराची आर्थिक मदत जाहीर केली.
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त #मोदीसरकार #खत #GoodNews #fertilizer #bags #cheapprice #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/CoFWCVTSTi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
केंद्र सरकार गुजरातमध्ये ‘इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप’ पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची केंद्राला माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्व राज्यांना केंद्र सरकार लवकरच मदत देणार आहे. संबंधित राज्यांनी केंद्राला नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* 13 जणांचा मृत्यू
‘तौक्ते’ सौराष्ट्रला धडकले. तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यामुळे किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार होत होते. सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला, तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, सोलर पॅनलही उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी तर मोबाईल टॉवरही पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
सोलापूरसह १७ जिल्ह्यांचा नरेंद्र मोदी घेणार उद्या कोरोना परिस्थितीचा आढावा
https://t.co/Bn4CIgfERO— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
वादळामुळे गुजरातमध्ये 40 हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. 16,500 कच्ची घरेही पडली आहेत. 2400 हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. 122 कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. येत्या 20 मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; व्हॉट्सॲपला स्पष्ट सूचना https://t.co/h0XkvFjs8R
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021