नवी दिल्ली : कोरोनाचा कहर कमी होत नाही तो ब्लॅक फंगसमुळे देशातील चिंता वाढली आहे. देशात या आजाराचे आतापर्यंत एकूण 5500 रुग्ण आढळले आहेत. तर 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून हा आकडा 90 आहे. आतापर्यंत पाच राज्यांनी याला महामारी घोषित केलं आहे.
तीन दिवस एसबीआयची यूपीआय व इंटरनेट बँकिंग सेवा राहणार बंद #bank #SBI #upi #3day #एसबीआय #INTERNET #banking #युपीआय #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/p1HK3HY9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे आतापर्यंत तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे या इन्फेशनमुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यातही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत पाच राज्यांनी याला महामारी घोषित केलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की अनेक राज्य या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बीच्या तुटवड्याचा सामना करत आहेत.
कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात https://t.co/2I5sAhhTKW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, देशात सध्या जवळपास 5500 रुग्ण ब्लॅक फंगसच्या विळख्यात आले आहेत. यातील 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 90 लोकांनी या फंगल इन्फेक्शनमुळे आपला जीव गमावला आहे. तर, हरियाणा 14 आणि उत्तर प्रदेशमध्ये 8 रुग्णांनी या इन्फेक्शनमुळे जीव गमावला आहे. नुकतंच बिहारच्या पाटणामग्ये ब्लॅकनंतर आता व्हाईट फंगसचे रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे, चिंतेत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे.
आता घरीच करा कोरोना टेस्ट, पुण्यातील होम टेस्टिंग किटला मंजुरी https://t.co/y5fMX9C8Xl
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
राजस्थाननंतर आता गुरुवारी गुजरातनंदेखील या आजाराला महामारी घोषित केलं आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांनी साथीचा आजार अधिनियमांतर्गत हा एक उल्लेखनीय आजार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर म्यूकरमायकोसिसचं प्रत्येक प्रकरणाची माहिती या राज्यांतील राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक झालं आहे.
कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोना देवीची स्थापना https://t.co/GMfeJBQ29z
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
* 70 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात
बातमीमधून असं समोर आलं आहे, की दिल्ली, तेलंगणा, ओडिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळसह कमीत कमी दहा राज्यांनी असं म्हटलं आहे, की या आजारावरील उपचारासाठी त्यांच्याकडे औषधं शिल्लक नाहीत किंवा स्टॉक अतिशय वेगानं कमी होत आहे. दुसरीकडे देशातील ब्लॅक फंगसच्या एकूण बळींपैकी 70 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. इथे ब्लॅक फंगसची 1500 हून अधिक प्रकरणं आढळली आहेत.
सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की राज्याला 1.50 वायल्सची गरज आहे. मात्र, केंद्रानं केवळ 16 हजार वायल उपलब्ध करुन दिल्या आहेत.