चहाचा शोध हा इसवी सन पूर्व काळात चीन मध्ये लागला. इसवी सन पूर्व 2737 मध्ये चीनमधील एक राजा शेन नून्ग ह्याला सत्तेवरून पायउतार करून जंगलात पाठवण्यात आले. युनान या प्रदेशात झाडाखाली बसून तो गरम पाणी पित होता. तेव्हा त्यात झाडाची काही पाने पडली. पानांमुळे पाण्याचा रंग बदलला आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजाला एकदम तरतरीत झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्या झाडाची पाने घालून गरम पाणी पिणे त्याने सुरु केले.
चहा माहीत नाही आणि चहा प्यायला आवडत नाही असा माणूस विरळाच. करोडो लोकांच्या घरात सकाळ उजाडते ती गरमागरम चहाने. सुगंध आणि तरतरी आणणारी चहापत्ती योग्य प्रमाणात उकळल्यावर त्यात दुध घालून उकळी आणून शेवटी साखरेचा गोडवा त्यात घोळवून घेतल्यावर जे अप्रतिम घमघमाट आणणारं मिश्रण तयार होतं ते सकाळची झोप उडवून तरतरी निर्माण करण्यासाठी पुरेसं असतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपण साधारणपणे दुध आणि साखर मिसळून चहा पितो. चहामध्ये मिरी पावडर, जायफळ पावडर, इलायची पावडर, चॅकलेट पावडर अशा अनेक प्रकारचे मसाले घालूनसुद्धा तो बनवण्याची पद्धत आहे. चहाचा मसाला म्हणून अनेक घरामध्ये गृहिणी स्वतंत्र काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ, इलायची, सुंठ पावडर अशा मसाल्यांच्या वस्तू घेवून त्याची पावडर करून ठेवतात.
* बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार
जगात चहाचे हजारो प्रकार बघायला मिळतात. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात कुठल्या मातीत झाले आहे तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे ह्यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव वेगळी आहे. जगभरातील चहाचे प्रकार. तुम्ही यांची नावेही ऐकली नसतील – व्हाईट टी, ग्रीन टी, वूलॉन्ग टी, ब्लॅक टी, हर्बल टी, रेड टी, ब्लूमिंग टी, टी ब्लेन्डस.
* एक चहाप्रेमी