वेळापूर : बंद घराच कुलूप तोडून चोरट्यांने घरात ठेवलेली साडे तेरा लाख रुपयाची रोकड चोरुन नेली आहे. चोरीची ही घटना माळशिरस तालुक्यातील ठाकूर बुवा, उघडेवाडी येथे घडली आहे. हबीब चंदुलाल तांबोळी (वय ७२ रा. उघडेवाडी) यांनी या बाबत पोलीसात फिर्याद दिली आहे.
बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार मागितले https://t.co/8xQXNwsPSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
तांबोळी यांच्या बंद घराच्या दोन्ही दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेली साडे तेरा लाख रुपयाची रोकड चोरुन नेली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.
फिर्यादी हबीब मुलाणी हे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त अधिकारी यांच्या घरी ही घरफोडी झाली असून विशेष म्हणजे कोरोना बाबत उपचार घेण्यासाठी हे कुटुंब पुण्यात असताना हा प्रकार घडला आहे. फिर्यादी पत्नी विकसबेगमसह रहाण्यास आहेत. ते अन्न व औषध प्रशासन विभागातून सुपरवायझर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, अखेर मान्सून आला https://t.co/CQRpIYPAU4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
मोहोळ ते आळंदी जाणारे हायवे रोडमध्ये त्यांची शेती भूसंपादित झालु आहे. त्याचा मोबदला म्हणून त्यांना १,कोटी ३७ लाख,११ हजार, ९४२ रूपये मिळालेले आहेत. ही रक्कम त्यांची बॅक ऑफ बडोदा शाखा , उघडेवाडी या शाखेत जमा झाली. ३० डिसेंबर रोजी बँकेतून ३०, लाख रुपये शेतीचे कामाकरिता काढलेले होते. त्या रकमेतून दोन ट्रॅक्टर , रोटर , शेती अवजारे व एक ट्रॉली दुरूस्त केली तसेच इतर किरकोळ खर्चाकरिता असे एकूण १६,लाख ५०,हजार -रूपये खर्च झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पत्नी बिल्कीसबेगम हिला कोरोना झाला. दोघे अकलूज येथील अभय क्लीनीक येथे उपचारास अॅडमीट झाले, परंतु पत्नी बिल्कीसबेगम हिची तब्येत बिघडल्याने दोघांना मुलगा अश्पाक याने पुणे येथे उपचारास नेले. पुणेला जाताना उर्वरित रक्कम घरातील धान्याचे पेटीमध्ये लाल रंगाचे पिशवीमध्ये ठेवुन घरास कुलूप लावून गेले.
आमदार प्रणिती शिंदेंच्या आरोपावर पालकमंत्री पत्रकार परिषदेमधून गेले उठून https://t.co/LaugIBsYSh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
२१ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुलगा अश्पाक याच्या मोबाईलवरुन घरी चोरी झाल्याते कळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.चोरीच्या घटनेच्या तपासासाठी फिंगर प्रिंट आणि डाॅग स्काॅड पथक मागविले होते. बंगला व परिसरात तपासणी केली. याप्रकरणी वेळापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास वेळापुर पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे करीत आहेत.