मुंबई : ‘जीजाजी छत पर है’ मालिकेतून हिबा नवाब ही घराघरात पोहोचलीय. हिबानं कधीही बोल्ड कपडे परिधान केले नाहीत. याबाबत तिचे अनेकदा निर्मात्यांसोबत खटकेही उडाले आहेत. काम मिळालं नाही तरी चालेल पण असे कपडे परिधान करणार नाही, अशी तिची भूमिका आहे. ‘मुस्लीम संस्कृतीनुसार अंगप्रदर्शन करण्यास मनाई असल्यानं लहान कपडे परिधान करत नाही.’ असं तिनं सांगितलंय. हिबानं 2008 ला शू फीर कोई है मालिकेतून करिअरची सुरुवात केली.
'डोमिनोज' पिझ्झा कंपनीचा डेटा लिक, कोट्यवधी ग्राहकांचे कार्ड डिटेल्स उघड, जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्सhttps://t.co/SxqxrOjMez
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
हिबानं अद्याप कधीही बोल्ड किंवा लहान कपडे परिधान केले नाहीत. याबाबत अनेकदा तिचे शोच्या निर्मात्यांसोबत खटके देखील उडाले आहेत. परंतु तिनं लहान कपडे किंवा रिलिविंग कपडे परिधान करण्यास स्पष्ट नकार दिला. अगदी शोमधून बाहेर काढलं तरी चालेल पण असे कपडे परिधान करणार नाही अशी जणू भूमिकाच तिनं घेतली.
एक किलो प्लास्टिकवर भरपेट थाळी, अर्ध्या किलोवर नाश्ता मिळवा https://t.co/091uq1xeAn
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं यामागचं खरं कारण सांगितलं. अन् आपली भूमिका स्पष्ट केली. हिबा म्हणाली मी मुस्लीम कुटुंबातील तरुणी आहे. त्यामुळं मी लहान कपडे परिधान करत नाही. मुस्लीम संस्कृतीनुसार अंगप्रदर्शन करण्यास मनाई आहे, त्यामुळं मी कधीही लहान कपडे परिधान करत नाही.
राजीव सातव यांच्या मृत्यूची चौकशी होणार ? https://t.co/O3PpI4L81X
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
“मालिकेत ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेकदा मला बोल्ड कपडे परिधान करण्यास विचारलं गेलं. परंतु मी नेहमीच नकार दिला. अगदी काम मिळालं नाही तरी चालेल पण मी आपली तत्व मोडणार नाही” अन् जरी मी माझी तत्व मोडून हॉट दिसण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या कुटुंबीयांना आवडणार नाही. शिवाय त्यांचं मन मोडून मला करिअर करण्याची इच्छा नाही.” असंही ती या मुलाखतीत म्हणाली होती.
" आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय" https://t.co/HKY6ps1h4b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
हिबानं 2008 साली शू…फीर…कोई है या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती क्रेझी स्टुपिड इश्क, मेरी सासू मा, कुछ स्माईली हो जाए यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. सध्या ती जीजाजी छत पर है या मालिकेत झळकत आहे. या मालिकेमुळं तिला खऱ्या अर्थान लोकप्रियता मिळाली.