सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथील रहिवासी तथा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महामुद इसाक पटेल ( वय – 60) यांचे आज सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा लढवय्या निघून गेल्याचे दुःख शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, नातवंडं व वडील आहेत.
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष, महमूद पटेल यांचे निधन #शेतकरी #संघटना #स्वाभिमानी #सोलापूर #solapur #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gwueRhOuuT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
आठवड्यापूर्वीच त्यांच्या पत्नी लैलाबी महामुद पटेल ( वय – 54 ) यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कुंटुबीयावर महामूदच्या रूपाने दुसरा आघात झाला आहे. महामुद पटेल हे गेली अनेक वर्ष राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात लोकप्रिय होते.
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा – नवाब मलिक https://t.co/3tEMlz1Ceo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलन, उपोषण, मोर्चा आदी करून न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील कुरघोट येथील महामूद इसाक पटेल रहिवासी होते. सुरुवातीला ते शरद जोशी प्रणीत संघटनेचे शाखा अध्यक्ष होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिवानंद दरेकरनंतर शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महामूद पटेल यांच्यावर सोपविण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाळूतल्या 'वळू' मध्ये खळबळ;मोहोळ पोलिसांची वाळू तस्करीवर धाड, ९८ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहाजणांवर गुन्हा दाखल https://t.co/oRbRjnfiwb
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
सन 2014-15 नंतर आजतागायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करत होते. गेल्या एप्रिल महिन्याच्या 23 तारखेला महामूद पटेल, त्यांची पत्नी लैलाबी पटेल आणि जावईदेखील करोना पॉझिटिव्ह आढळले होते. सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने 27 एप्रिलला जावयाचा, तर 17 मे रोजी पत्नीचे करोनाने निधन झाले, तर रविवारी महामूद पटेल यांचे निधन झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी या निधनाबद्दल समाज माध्यमावर शोक व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव, एफआरपी मिळवून देण्यासाठी अनेक कारखान्यांवर आंदोलन, उपोषण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता.
उजनीच्या पाण्यावरुन शासनाची बनवाबनवी!, २२ गावांतील शेतक-यांच्या आंदोलनात मध्यस्थी करणारे अधिकारीच शासन नियुक्त समितीचे अध्यक्ष https://t.co/cJixMYpVQv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर तसेच धर्मराज काडादी यांच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर महामूद पटेल यांचे झालेले आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.