सोलापूर : देशभर धुमाकूळ घातलेल्या म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. सोलापुरातही रुग्णात वाढ होत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यत (ता. 21) 132 म्युकर मायकोसिस रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 120 रुग्ण उपचार घेत असून 30 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. यामुळे नागरिकांनी कोरोना झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज आहे.
'म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून शरीरात जातो' https://t.co/Q2qgKhmUSD
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसच्या रुग्णांबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.
या रुग्णांकरिता ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेतून उपचार घेता येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना उपचारासाठी गेले पुण्याला, वेळापुरात साडेतेरा लाखांची रोकड चोरीला
https://t.co/XABgCTq4ao— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
वाढीव बिलांच्या अजूनही नागरिकांच्या तक्रारी येत असून डॉक्टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे. नातेवाईकांनी डॉक्टरांकडून पक्के बिल घ्यावे. रुग्णालयांनी शासकीय दरपत्रक सक्तीने लाऊन घ्यावे. सलमान खान यांच्या बिईंग ह्युमन संस्थेने 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिली असून जिल्ह्यातील आणि बाहेरील सामाजिक संस्था, उद्योग यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न करा. या योजनेच्या रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांच्या शंका दूर कराव्यात, अशा सूचना भरणे यांनी केल्या.
बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार मागितले https://t.co/8xQXNwsPSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021
शासनाकडे जादा मागणी नोंदवून रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस यंत्रणेने पेट्रोलिंग, कारवाया वाढविल्या पाहिजेत. पोलिसांना साखर कारखाने, बाजार समित्या यांची वाहने उपलब्ध करून द्याव्यात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिरिक्त माल भरणारी जड वाहतूक तपासणीसाठी नाके वाढवावेत.
मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना तातडीचा आदेश अशा प्रकारचा उल्लेख तात्काळ हटवा #surajyadigital #Modi #Sarkar #मोदी #socalmedia #socal #media #सोशलमीडिया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0qwyXWzEvQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 22, 2021