मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली. ते म्हणाले की, रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे. तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा असंही ते म्हणाले.
'मुस्लीम धर्मात अंग प्रदर्शनास मनाई असल्याने बोल्ड ड्रेस परिधान करत नाही' https://t.co/ETajR1Pvn4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
योगगुरू रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलोपॅथीविरोधात कथित वक्तव्य केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी योगगुरू रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविली.
IMA HQs Press Release on 22.05.2021 pic.twitter.com/rrc1LXA24n
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) May 22, 2021
तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच बंद करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. रामदेव जनतेत भीती व निराशा निर्माण करत आहेत. आयएमएने म्हटले आहे की, वैज्ञानिक औषधांची बदनामी करून लोकांना खंडणीसाठी घेऊन जाणे आणि व्यवसाय जिंकणे हे निषेधार्ह गुन्हे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एक किलो प्लास्टिकवर भरपेट थाळी, अर्ध्या किलोवर नाश्ता मिळवा https://t.co/091uq1xeAn
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदेवबाबांपासून ते केंद्र सरकारवर टीका केली. देशात कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितले जात आहे. रामदेवबाबा सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे. ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, याबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले.
'डोमिनोज' पिझ्झा कंपनीचा डेटा लिक, कोट्यवधी ग्राहकांचे कार्ड डिटेल्स उघड, जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्सhttps://t.co/SxqxrOjMez
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021