नवी दिल्ली : राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही फक्त भारतातील केंद्र सरकारलाच कोरोनावरील लस देणार, अशी भूमिका अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायझरने स्पष्ट केली आहे. याआधी पंजाब आणि दिल्ली सरकारने फायझरकडे कोरोना लशीसाठी मागणी केली होती. पण कंपनीकडून त्यांना नकार दिला आहे. दरम्यान मोदी सरकारने याआधी राज्यांनाही कोरोना लस विकत घेण्यास परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रात सोलापूरसह 14 जिल्ह्यांतील लॉकडाऊन वाढणार https://t.co/es598EEATJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
विदेशी फार्मा कंपन्या फायझर आणि मॉडर्नानं दिल्ली सरकारला लस पुरवण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. “दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले. यापूर्वी मॉडर्नानं पंजाब सरकारलादेखील लसीचा थेट पुरवठा करणार नसल्याचं म्हटलं होतं. थेट केवळ केंद्र सरकारला लसी पुरवल्या जातील असं त्यांनी म्हटलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“आम्ही फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांशी लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. दोन्ही कंपन्यांनी आम्हाला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला. केवळ भारत सरकारशी व्यवहार करणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. केंद्र सरकारनं लसींची आयात करावी आणि राज्यांना ती वाटावी अशी विनंती मी करत आहे,” असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी पंजाबलादेखील लसींचा थेट पुरवठा करण्यास नकार दिल्याची माहिती पंजाबच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली होती. मॉडर्नानं पंजाबला थेट लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. तसंच त्यांचा केवळ केंद्र सरकारशी व्यवहार आहे, असं त्यांनी सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
मराठा आरक्षण आंदोलन : भाजपची मोठी घोषणा https://t.co/JK61i2BREY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व लस उत्पादक कंपन्यांशी थेट लस खरेदी करण्यासंदर्भात संपर्क करण्यात आला होता. यामध्ये Sputnik V, फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांचा समावेश होता. मॉडर्नानं राज्य सरकारसोबत करार करण्यासाठी नकार दिला आहे,” असं पंजाबचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी सांगितलं होतं.
* फायझर-मॉडर्नाकडून दिल्लीला लस देण्यास नकार
अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायझर व मॉडर्ना यांनी पंजाबनंतर दिल्ली सरकारला थेट कोरोना लस देण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. तसेच आपण थेट केंद्र सरकारसोबत करार करु, त्यांनाच कोरोना लशींची विक्री करु, असे आपल्याला कंपन्यांकडून सांगण्यात आल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता केंद्रानेच लशींची आयात करावी व राज्यांना वाटप करावे, असे ते म्हणाले.