वाशिंग्टन : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेक जण मानसिक तणावात आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये अनोखा पर्याय शोधून काढला आहे. लोक मानसिक शांतीसाठी गाईला मिठी मारत आहेत. त्यासाठी लोक २०० डॉलरपर्यंत म्हणजे महिना १४,५०० रुपये खर्च करत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. गाईला मिठी मारल्याने तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाचे लक्षणही कमी होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. भारतात गाईंना सर्वश्रेष्ठ मानलं जातं. हजारोवर्षापासून गाईंची पूजा केली जाते.
"जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर", रामदेवबाबांचा आणखीन एक व्हिडीओ आला समोरhttps://t.co/6VxSlwMmEo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगासह भारतातही बिकट अवस्था केली आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश सरकारने कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावत लोकांना घरातच राहण्याची सक्ती केली आहे. अशावेळी लोकांवर मानसिक तणाव आला आहे. हा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'फ्लाईंग सिख' मिल्का सिंग यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल https://t.co/5KMxYvNnvO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
अमेरिका आणि युरोपमध्ये अनोखा पर्याय शोधून काढला आहे. लोक मानसिक शांतीसाठी गाईला मिठी मारत आहे. त्यासाठी अनेकजण २०० डॉलरपर्यंत पैसेही देत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अमेरिकेतील लोक गाईला मिठी मारण्यासाठी प्रति तास २०० डॉलरपर्यंत म्हणजे १४,५०० रुपये खर्च करत आहेत. गाईला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असं नाही तर यामुळे निरोगी राहण्यासही खूप फायदा होत असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात गाईला गोंजारणं आणि तिला कवेत घेणे ही जुनी परंपरा आहे. आता जगात सध्या हा ट्रेंड बनला आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गाईला मिठी मारल्यानं घरात एका लहान मुलाला आणि पाळीव प्राण्याला पाळल्याची जाणीव होते. एक मिठी हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचं काम करतं. कोर्टिसोल कमी करतं. त्यासोबत तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाचं लक्षणही यामुळे कमी होत असल्याचं डॉक्टर सांगतात. गाईचा स्वभाव शांत, कोमल आणि ध्यैर्यवान आहे. गळाभेट करणाऱ्याच्या शरीराचं तापमान, ह्रदयाची गती आणि मोठ्या आकाराचा फायदा होता. हे सर्व शरीरात मेटाबोलिझम, इम्युनिटी आणि तणाव यांच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसला चाहता, वडिलांवर केले चाकूने वार https://t.co/PLfpm7QL5C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
* अमेरिकेत ट्रेंड सुरु; गाईला मिठी मारण्याचे डॉक्टरांनी सांगितले फायदे
– भारतात गाईला गोंजारणं, कवेत घेणे हजारो वर्षे जुनी परंपरा आहे.
– गाईला मिठी मारल्यानं घरात एका लहान मुलाला पाळल्याची जाणीव होते.
– आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, डोपामाइन हार्मोन्स तयार होतात.
– तणावाची पातळी, चिंता कमी होते.
– गाईचा स्वभाव शांत, कोमल, धैर्यवान आहे.
– गळाभेट करणाऱ्याला ह्रदयाच्या गतीबाबतचा फायदा होता.