सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवानंद पाटील यांची आज नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती झाली आहे. आज मंगळवारी पालिकेच्या भाजपा कार्यालयात शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत मावळते सभागृहनेते श्रीनिवास करली यांच्याकडून पाटील यांनी पदभार घेतला.
जप्त केलेल्या वाहनांची होणार सुटका; कागपत्रे, दंड भरून घेऊन जा आपले वाहन https://t.co/yuN2keJZMU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सभागृहनेते बदलण्याच्या हालचालींना वेग आला होता. सभागृह नेतेपदी अनेकजण इच्छुक होते. मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक शिवानंद पाटील यांचे नाव चर्चेत होते. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे निवडीचे पत्र पाठवले. त्यानुसार सभागृह नेतेपदी शिवानंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन https://t.co/JJSd0q749t
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
भाजपा कार्यालयात हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम , शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नागेश भोगडे, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली उपस्थित होते. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही निवड झाली आहे. सभागृहनेते आणि आपण मिळून समन्वयाने शहराचा कारभार केला. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समन्वयाने कारभार करण्याची अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त नगरसेवक, कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा बदल करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.
शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्य पद रद्द https://t.co/bSd6Ek6NwI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
तर मावळते सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी विस महिने साभागृह नेतेपदाच्या कालावधीत केलेल्या कामकाजावर सामाधन आहे. पक्षाने जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवला असल्याची मत व्यक्त केले. सर्व नगरसेवक , पदाधिकारी आणि प्रशासनाला बरोबर घेऊन शहराचा विकास करण्यावर आपण भर देणार असल्याचे मत शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसला चाहता, वडिलांवर केले चाकूने वार https://t.co/PLfpm7QL5C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021