मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विलासराव यांचे चिंरजीव अभिनेता रितेश देशमुख आणि स्नुषा अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन विलासरावांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
तरूण सरपंचानं करून दाखवलं; सोलापुरातलं 'गाव' कोरोनामुक्त केलं https://t.co/ZaOdIkY2JA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आज ७६ व्या जयंतीनिमित्त त्यांची सून अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने खास फोटो शेअर केला आहे. तसेच या दिवशी रितेश देशमुख याने देखील एक भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना या दोघांनीही सोशल मिडियद्वारे उजाळा दिला आहे.
https://twitter.com/PeekayKalra/status/1397530530107691011?s=19
जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते. तिनं शेअर केलेल्या पोस्टची नेटकरी नेहमी दखल घेऊन त्यावर चर्चा होत असते. यापूर्वीही जेनेलियानं मदर्स डे निमित्त सासूबाईविषयी पोस्ट शेअर केली होती. तर रितेशचा नृत्य करतानाच व्हिडिओही तिनं शेअर केला होता. आज रितेश, जेनेलिया यांनी विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जेनेलियाने ट्वीट करत एक फोटो शेअर करत लिहिले की,’वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील’ असं कॅप्शन देत जेनेलियांना विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश-जेनेलियाच्या लग्नातील आहे.
Happy Birthday Pappa
We miss you 💚💚💚
A Father- Daughter hug that will last forever pic.twitter.com/xGOKpu12Jf
— Genelia Deshmukh (@geneliad) May 26, 2021
जेनेलियानं विलासराव यांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे. ती आपल्या टि्वटमध्ये म्हणते, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील” रितेशने जेनेलियाचं टि्वट रिटि्वट केलं आहे. तर रितेशनं आपल्या वडीलांसोबत लहानपणाचा फोटो शेअर केला आहे.
जेनेलियाच्या फोटोवर अनेक जणांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियाने दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
Dear God!
Please turn back the clock to this time.
Miss you every day PAPPA, Happy Birthday!!!! #VilasraoDeshmukh76 pic.twitter.com/ilJLSIgxz2
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 26, 2021
तर दुसरीकडे रितेशने देखील एक पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणीना उजाळा दिल आहे. यावेळी रितेशनेही लहानपणीचा फोटो शेअर करत ‘देवा, घड्याळाचे काटे कृपया पुन्हा उलटे फिरव. तुमची दररोज आठवण येते पप्पा’ असं कॅप्शन दिलं आहे.