नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याचा फायदा लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्यांना होणार आहे. लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार, काही खासगी संस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्याबाबत वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, हॉटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्रीसह अनेक उद्योगांनी सरकारकडे मदत पॅकेजची मागणी केली आहे.
गाईला मिठी मारल्याने मिळतेय मानसिक शांती; अमेरिकन लोकांनी शोधला उपाय https://t.co/BMa6B13u7a
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. मृतांची संख्यादेखील कमी होत असल्यानं दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मोदी सरकारनं राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली नाही. मात्र स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारांनी स्थानिक पातळ्यांवर लॉकडाऊनबद्दलचे निर्णय घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूसारखी औद्योगिकरणात अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू झाल्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मिंटनं दिलेल्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्यासाठी मोदी सरकारनं पॅकेजची घोषणा केली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अतिशय भीषण होती. त्यामुळे आता सरकार कोणत्या घोषणा करतं याकडे लक्ष लागलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शंभरी गाठली…
पेट्रोलने एकदाची शंभरी गाठली, याच्यापुढेही जावू शकते का? आपणास काय वाटते #fuelpump #surajyadigital #fuel #fuelprise #इंधन #शंभरी #सुराज्यडिजिटल #Rs100 pic.twitter.com/ce33cMH5Zz— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका आहे. अनेक क्षेत्रांवर कोरोना संकटाचा परिणाम झाला. या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना प्रोत्साहन पॅकेज देण्याची तयारी मोदी सरकारकडून सुरू आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सामना कराव्या लागणाऱ्या उद्योगांना सशक्त करण्याचा उद्देश यामागे आहे.
कोरोना संकट : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मोठा आदेश, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर https://t.co/DhTWz54LlL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसोबतच पर्यटन, उड्डाण आणि आदरातिथ्य क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. या क्षेत्रांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार पॅकेजवर काम करत असल्याचं वृत्त लाईव्ह मिंटनं दिलं आहे. आर्थिक पॅकेज देण्याबद्दलची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे घोषणा नेमकी कधी होणार, याबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचं मिंटनं वृत्तात म्हटलं आहे.
31 मे ला अहिल्यादेवी जयंती दिवशी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा जागर करा, आणि या महाविकास आघाडीच्या गड्यांना हादरा द्या – आमदार गोपिचंद पडळकर #surajyadigital #धनगर #आरक्षण #जागर #reservations #सुराज्यडिजिटल #चौंडी #गोपिचंदपडळकर https://t.co/5qDT2DoEVA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021