मुंबई : ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या काही तासातच यासंबंधीचा आदेश जारी झाला आहे. यामुळे कोरोनासह म्युकर मायकोसिसविरुद्धच्या लढ्याला बळ मिळाले आहे.
ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र रेमडेसिवीरप्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 25, 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या परिस्थितीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. लगेच तसा जीआरही काढला. त्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळही मिळालं आहे.
राज्यातील कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या. संसर्गीताच्या संपर्कातील हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर भर देण्याचं सूचित केलं. pic.twitter.com/tKtZhBCvvO
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 25, 2021
जिल्हा गौण खनिज विकास निधीतून आरोग्यासाठी 30 टक्के निधी खर्च करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासातच यासंबंधीचा आदेश जारी झाला आहे. यामुळे कोरोनासह म्युकर मायकोसिसविरुद्धच्या लढ्याला बळ मिळाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात आरोग्यसुविधा उभारता येणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपातळीवर किमान 30 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जिल्हा गौण खनिज विकासनिधीतून आरोग्यासाठी 30 टक्के निधी खर्च करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना आज तात्काळ देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी, असं स्पष्ट केलं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 25, 2021
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 30 टक्के रक्कम आरोग्य विषयासाठी खर्च करण्यास याआधीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरासाठी 3 हजार 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 1 हजार 100 कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण 350 आमदारांचा 350 कोटी रुपयांचा निधी कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे.
दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानव जातीचं कल्याण सामावलं आहे, हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे… स्मृतीस त्रिवार वंदन !…#surajyadigital #बुद्धपौर्णिमा #सुराज्यडिजिटल #budha #स्मृती #अभिवादन pic.twitter.com/zel8tVu3sT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना संपर्कात असणाऱ्या हाय रिस्क, लो रिस्क व्यक्तींच्या कोराना चाचणीवर भर द्यावा. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या 131 रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.
31 मे ला अहिल्यादेवी जयंती दिवशी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा जागर करा, आणि या महाविकास आघाडीच्या गड्यांना हादरा द्या – आमदार गोपिचंद पडळकर #surajyadigital #धनगर #आरक्षण #जागर #reservations #सुराज्यडिजिटल #चौंडी #गोपिचंदपडळकर https://t.co/5qDT2DoEVA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021