राजस्थान : राजस्थानच्या भरतपूर येथील भाजपा खासदार रंजीता कोली यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. धरसोनी गावात हा हल्ला झाला. त्यात खासदाराच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तर खासदारांनाही किरकोळ दुखापत झाली. उपस्थितांनी सांगितले की, हा हल्ला खूप भयंकर होता. हल्ल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. दरम्यान, कोली या एका सामूहिक आरोग्य केंद्राचं निरिक्षण करण्यासाठी गेल्या होत्या.
उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून सात ठार, गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू https://t.co/laJhgxQVf7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
भरतपूर येथील भाजपा खासदार रंजीता कोली यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. रंजीता कोली या एका सामूहिक आरोग्य केंद्रांचं निरिक्षण करण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी धरसोनी गावात काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यात खासदाराच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तर खासदारांनाही किरकोळ दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
हमला इतना भयावय था की सांसद महोदया अचेत होकर बेहोश हो गईं। पुलिस से संपर्क किया गया परंतु पुलिस को घटनास्थल तक पहुंचने में 45 मिनट लग गए, दूसरी ओर @BHARATPUR_DM को निरंतर फोन करने के बाद भी उनके द्वारा फोन नहीं उठाया गया।
– टीम भरतपुर सांसद@ArunSinghbjp @v_shrivsatish @RajCMO
— Ranjeeta Koli MP (मोदी का परिवार) (@RanjeetaKoliMP) May 27, 2021
खासदार रंजीता कोली यांनी ३ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, भरतपूर मतदारसंघात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या किती आहेत त्याचे योग्य आकलन होत नाही. दिवसाला किमान ५ हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यासोबत भरतपूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी लपवू नका असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला होता.
फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
खासदार रंजीता कोली यांना हल्ल्यानंतर तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधून उपचारानंतर त्या शासकीय विश्रामगृहात गेल्या. काही दिवसापूर्वी खासदारानं कोरोना आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. खासदारांसोबत असलेल्यांनी सांगितलं की, हा हल्ला खूप भयंकर होता. हल्ल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर पोलिसांना संपर्क केला परंतु पोलीस घटनास्थळी ४५ मिनिटांनंतर पोहचले. तर भरतपूर जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार फोन केल्यानंतरही त्यांनी फोन उचलला नाही.
डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा, 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामनाhttps://t.co/OwIfEwzu3D
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021