नवी दिल्ली : अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करून बाबा रामदेव हे वादात सापडले आहेत. त्यांच्या पतंजली कंपनीला बाटलीबंद राईचं तेल पुरवणारा कारखाना सील करण्यात आल्याने त्यांची कंपनीची वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. राईच्या तेलात भेसळ केल्याचा संशय असल्याने हा कारखाना सील करण्याचे आदेश देण्यात आले होते.
१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार https://t.co/oIjtMxKZ5i
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
अलवर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईचं व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आलं आहे. खाद्य तेल संघटनेने यापूर्वीही पतंजलीच्या राई तेलावर आक्षेप नोंदवले होते. पतंजलीने त्यांच्या राईच्या तेलाच्या जाहिरातीमध्ये दावा केला होता की अन्य कंपन्यांच्या राई तेलात भेसळ असते.
सोलापूर : उद्धव ठाकरे, काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोविड हत्याकांड, भाजप कोविडचे स्पेशल अॉडिट करणार- किरीट सोमय्या #kovid19 #भाजपा #solapur #political #अॉडिट #किरीटसोमय्या #solapur #सोलापूरhttps://t.co/BTqwPPW0sh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
राजस्थानातील खैरथल इथल्या सिंघानिया कारखान्यात पतंजलीच्या नावाने राई तेलाचे पॅकींग केले जात असून तिथे भेसळही केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी अलवर जिल्ह्यातील या कारखान्यावर छापा मारला होता. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पॅकींगचे साहित्य सापडले आहे.
पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द, पुणेकरांमध्ये पोलिसांची धास्ती https://t.co/fkAAUvYzOv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
पतंजलीच्या नावाखाली भेसळयुक्त तेल पॅक करून ते विकलं जात असल्याच्या आरोपाखाली हा कारखाना सील करण्यात आला आहे. या कारखान्याला पतंजलीच्या तेलाच्या पॅकींगची परवानगी मिळाली होती. याशिवाय कारखान्यात श्री श्री ऑईल या ब्रँडचे रॅपरही सापडले आहेत. छापेमारीदरम्यान तेलाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
भाजपा खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांकडून सशस्त्र हल्ला https://t.co/HaGbx9dHjU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
कारखाना मालकाकडे जिल्हा प्रशासनाने पतंजलीला तेलपुरवठा करण्यासाठी केलेली करारपत्रे, परवाने आणि इतर महत्वाची कागदपत्रे मागितली आहेत. या कारखान्यातून पतंजलीला राईचं तेल पुरवलं जात होतं, पतंजली कंपनी तेलाच्या बाटलीवर आपल्या शिक्का मारून ते बाजारात विकत होती, असं वृत्त आहे.
फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021