हैदराबाद : तेलंगणात एकाने बिरयाणीची ऑर्डर दिली होती. सोबतच मला मसाला आणि लेग पीस जास्तीचा हवा, अशीही यात विनंती होती. मात्र त्याचा ऑर्डर काही बरोबर पूर्ण झाला नाही. त्यामुळे त्याने लोकांची सेवा करण्याची हीच पद्धत आहे का ? असे ट्विट करत तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव यांना सवाल केला. त्यावर मला कशाला टॅग केलास, माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे ? अशी विचारणा रामा राव यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग – प्रकाश आंबेडकर;तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत?
https://t.co/zVhcBEf8Pw— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
तेलंगणमध्ये हा प्रकार घडला आहे. राज्याचे महापालिका प्रशासन व नागरी विकास मंत्री के.टी.रामा राव यांच्याबाबत ही घटना घडली आहे. केटीआर हे ट्विटरवर सतत सक्रिय असतात. अनेक नागरिकांच्या त्यांच्याकडे ट्विटरवर तक्रारी करीत असतात. ते या तक्रारी तातडीने सोडवतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे ते पुत्र आहेत. अनेक वेळा सोशल मीडियावरुन नागरिक त्यांच्याकडे मदत मागतात. ते सरकारी अधिकाऱ्यांना सूचना करुन मदत पोचवतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
And why am I tagged on this brother? What did you expect me to do 🤔🙄 https://t.co/i7VrlLRtpV
— KTR (@KTRBRS) May 28, 2021
थोटाकुरी रघुपती या व्यक्तीने झोमॅटोवरुन बिर्याणी मागवली होती. त्याने बिर्याणी मागवताना त्यासोबत एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीसही मागवला होता. परंतु, त्याला मसाला आणि लेग पीस मिळाला नाही. त्यामुळे त्याने दाद मागण्याचे ठरवले. त्याने ट्विट केले आणि यात झोमॅटो आणि केटीआर यांना टॅग केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते की, मी चिकन बिर्याणीसह एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीस मागवला होता. परंतु, मला बिर्याणीसोबत ते मिळालं नाही. अशा प्रकारे तुम्ही जनतेला जेवण देता का?
भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील घटनाhttps://t.co/IlNZLqezvp
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
या ट्विटला केटीआर यांनीही उत्तर दिले. भावा, मला या ट्विटमध्ये का टॅग केले आहेस? मी यात काय करणे अपेक्षित आहे, असे उत्तर त्यांनी दिले. यानंतर हे ट्विट व्हायरल झाले. यामुळे तक्रार करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट तातडीने डिलिट केले. परंतु, त्या ट्विटचा स्क्रीनशॉटही आधीच व्हायरल झाला होता. यावरुन सोशल मीडियावर ट्रेंडही सुरू झाला होता. अनेकांनी हैदराबादमधील लोक त्यांच्या बिर्याणीला फार गंभीरपणे घेतात, असा सूर आळवला होता.
'पतंजली' बाटलीबंद तेल पुरवणारा कारखाना सील, भेसळ केल्याचा संशय https://t.co/OWUtQtGaq9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021