भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे.
समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३) ,अर्पिता शिवाजी तानवडे (वय ९) ,आरती शिवानंद पारशेट्टी (वय १३), विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय ११) असे बेपत्ता झालेल्या मुलां-मुलींची नांवे होते. शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती तसेच सुमित्रा शिवाजी तानवडे यांची मुलगी समिक्षा आणि अर्पिता हे चौघे शनिवार दुपारी ३.३० च्या सुमारास जवळच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याच्या अंदाज न लागल्याने चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील घटनाhttps://t.co/IlNZLqezvp
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
गावातील तसेच परिसरातील काही धाडसी तरुणांनी शोध कार्य चालू केले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्री उशिरापर्यत शोध कार्य चालूच होते. रात्रीचा वाढता अंधार आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून रात्री उशिरा शोधकार्य थांबवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज रविवारी सकाळ उजाडताच पुन्हा शोधकार्य सुरु केले. पहिल्यांदा आरतीचा मृतदेह सापडला. नंतर समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा एकमेकांच्या गळ्यात पडलेले मृतदेह सापडले. शेवटी दुपारी पावणेएकच्या दरम्यान विठ्ठलचा मृतदेह सापडला.
शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह, देश हळहळला, आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यताhttps://t.co/MANfgGdob1
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
महसूल विभागाचे प्रांतधिकारी दीपक शिंदे, पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी घटना घडल्यापासून घटनास्थळी राहून शोधमोहीम महत्त्वाची कामगिरी बजावली. एनडीआर एसचे पथक आणि सादेपुरचा मानसिंग भोई या धाडसी तरुणांने या शोधमोहिमेत पुढाकार घेऊन चारही मृतदेह बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला, ७-८ वर्षांच्या मुलाला मागे ठेवून पत्नीचे निधनhttps://t.co/p8JMd0CyfE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
या शोधमोहिमेत प्रथम आरतीचा मृतदेह बाहेर काढले. काही तासानंतर एकमेकांच्या गळ्यात पडलेल्या समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसताच मानसिंगने खोल आणि प्रचंड अशा पाण्याच्या प्रवाहात जाऊन या दोघींचा मृतदेह नदीकाठावर आणला. शेवटी विठ्ठलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. या धाडसी तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लवंगी गावातील कोवळ्या चिमुकल्या मुलामुलीवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
बिरयाणीत लेग पीस दिला नाही, थेट मंत्र्याकडे तक्रार, काय मिळाले उत्तर https://t.co/neoA4tw0np
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021