मुंबई : विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना करोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.
पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक कोरोनामुक्त #pune #coronafree #पुणे #surajyadigital #वाटचाल #सुराज्यडिजिटल #कोरोनामुक्त pic.twitter.com/NBB47teMyY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
कादंबरी कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी (ता. २९ मे) सकाळी कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण कडूच्या काही मित्र आणि निकटवर्तीयांनी त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुरुवातीला त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयातही आणण्यात आलं.
तेजश्री प्रधान ठरली महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षक महिला, शेंटीमेंटल पल्लवी दुस-या स्थानी https://t.co/SnDPOsgQWR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. सध्या भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ७-८ वर्षांच्या मुलाला मागं ठेवून आणि सहजीवनाचा हा प्रवास अर्ध्यावरच सोडून कादंबरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नियतीनं या कलाकाराच्या कुटुंबासोबत केलेला खेळ पाहून अनेकांचं मन हेलावत आहे.
बिरयाणीत लेग पीस दिला नाही, थेट मंत्र्याकडे तक्रार, काय मिळाले उत्तर https://t.co/neoA4tw0np
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
‘बिग बॉस’च्या घरात असतेवेळी भूषणची पत्नी सर्वांसमोर आली होती. आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयासोबतच मनमिळाऊ स्वभावासाठी हा अभिनेता कायमच सर्वांची मनं जिंकत असतो. पण, इतरांच्या आनंदासाठी कला सादर करणाऱ्या या कलाकावर आता मात्र ही काय वेळ आली, असंच म्हणत अनेकांनीच त्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.
भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील घटनाhttps://t.co/IlNZLqezvp
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021