सोलापूर : सोरेगाव येथील नागेश ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीरपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करीत २३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
'त्या' चारही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, वीस तासानंतर यश https://t.co/IfH5PdjbCV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, सध्या कोरोना महामारीमुळे सोलापूर शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू असून, संचारबंदीचा अंमल सुरू आहे. संचारबंदीच्या कालावधीत विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सोरेगाव जवळचे नागेश ऑर्केस्ट्रा बारमध्ये बिनधास्तपणे ऑर्केस्ट्रा बारचे मालक सुनिल संगमेश्वर सुरगीहळळी व नागेश संगमेश्वर सुरगी हळळी या दोघांच्या संगनमताने बेकायदेशीर जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार पोलिस पथकाने नागेश ऑर्केस्ट्रा बारवर सापळा रचून धाड टाकली आहे. या धाडीत मालकासह २३ जणांवर गुन्हा दाखल केला. २३ लाख ९ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.
विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला, ७-८ वर्षांच्या मुलाला मागे ठेवून पत्नीचे निधनhttps://t.co/p8JMd0CyfE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त डाॅ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील,पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार कोल्हाळ, सहाय्यक फौजदार संजय मोरे,पोलीस हवालदार राजकुमार तोळणुरे, श्रीरंग खांडेकर,पोलीस नाईक प्रकाश निकम, पोलीस शिपाई शिवानंद भिमदे, अतिष पाटील, पोलीस शिपाई अनिल गवसाने, इम्रान जमादार,लखन माळी, पिंटू सोनटक्के यांनी पार पाडली.
यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, सूर्यग्रहण कुठे – कुठे दिसणार अन् वेळ https://t.co/axODNSH9d9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
* अटक केलेल्यांची नावे
या धाडीत बारमालक सुनिल संगमेश्वर सुरगीहळ्ळी (वय ३६ वर्षे, रा.घर नं ०१ यामीनी नगर, विजापूर रोड, सोलापूर), नागेश संगमेश्वर सुरगीहळ्ळी (वय ४० वर्षे, रा. घर नं ०१, यामीनी नगर, विजापूर रोड, सोलापूर) या दोघांसह मंजुनाथ सुखदेव जाधव (वय ३६ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर) , यल्लप्पा यमनप्पा जाधव (वय ३९ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६), नागेश रामकृष्ण गायकवाड (वय २५ वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं २. ), सचिन सुरेश जाधव (वय ३६ वर्षे, रा. घर नं ३६३ भैरुवस्ती, लिमयेवाडी), दिपक सुदंरसिंग चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. हुसेन नगर, वांगी रोड), विनायक अशोक काळे (वय ३० वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं १), ज्ञानेश्वर अर्जुन चव्हाण (वय ३० वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं १), राकेश नरसिंग हुच्चे (वय २९ वर्षे, रा. शुक्रवार पेठ), राजु आनंद जाधव (वय २८ वर्ष, गैबीपीर नगर), दिपक किसन चव्हाण (वय ३१ वर्षे, रा. सुशिल नगर, विजापूर रोड), जावेद खताल शेख (वय ३२ वर्षे, रा. भैय्या चौक, वार चाळ शेजारी), तुळजाराम यमनप्पा जाधव (वय ४६ वर्षे, रा. महालक्ष्मी नगर, साईहोम्स नगा, सुभद्रा मंगल कार्यालय जवळ), अंबादास बबन शिवशरण (वय ४१ वर्षे, सुशिल नगर, विजापूर रोड), नागेश चंद्रकांत जाधव (वय ३० वर्षे, रा. लिमयेवाडी), प्रशात भिमाशंकर गायकवाड (वय ४० वर्षे, रा. गणेश नगर), रेवण नागनाथ जाधव (वय ५३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं २), विनायक अरविंद जाधव (वय २८ वर्षे, रा. धानम्मा देवी मंदिराजवळ, खाद्री नगर, अक्कलकोट रोड), देविदास अर्जुन कोकरे (वय ३१ वर्षे, रा. माळीगल्ली सोरेगांव, विजापूर रोड), सागर धर्मराज पवार (वय २९ वर्षे, रा. घर नं, २६ कमलानगर, विजापूर रोड), गजानन देवराव देशपांडे (वय ४० वर्षे, रा. घर नं १४२/४३ डी-१, शेटेनगर, भैय्याचौक), अजिंक्य अशोक देशमुख (वय ३० वर्षे रा. घर नं १४१, रमन नगर, अक्कलकोट रोड) यांना अटक केली आहे. त्यांनी जुगार खेळण्यासाठी लावलेली रोख रक्कम व त्यांचे जवळ असलेले मोबाईल हॅन्डसेट, वाहने असा एकूण २३ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत महाराष्ट्र जुगार कायदा ४, ५ सह भा.द.वि. कलम १८८ सह साथीचे रोग नियंत्रण कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह, देश हळहळला, आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यताhttps://t.co/MANfgGdob1
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021