लखनौ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये 2 व्यक्ती मृतदेह पुलावरून नदीत फेकताना दिसत आहेत. कोरोनामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बलरामपूरचे सीएमओ बी. बी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या कोरोना रुग्णाचा मृत्यू 28 मे रोजी झाला होता. कुटुंबातील सदस्यांनीच मृतदेह नदीत फेकला होता. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आला हो आला! स्कायमेट म्हणतं मान्सून आला ! , स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यामध्ये चांगलीच जुंपली https://t.co/2ReWsz0tnh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने आधीच योगी सरकारवर देशभरातून टीका होते आहे. दुसरीकडे अजून धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती कोरोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे.
#Balrampur– पीपीई किट पहने दो युवकों द्वारा राप्ती नदी पुल से नदी में शव फेंकते वायरल वीडियो के सम्बंध में सीएमओ डॉ वीबी सिंह की बाईट @Uppolice @AdgGkr @dgpup @AwasthiAwanishK @CMOfficeUP @InfoDeptUP @myogiadityanath @bstvlive @IndiaToday @News18UP @htTweets @hemantkutiyal pic.twitter.com/ZXGyBnAstm
— BALRAMPUR POLICE (@balrampurpolice) May 30, 2021
उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रापती नदीमध्ये हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे. प्रेमनाथ असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती करोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रापती नदीमध्ये हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे.
फडणवीस शरद पवारांना अचानक घरी जावून भेटले, चर्चांना उधाण, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
https://t.co/gpgdrzq9Vd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
प्रेमनाथ असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.बलरामपूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान 28 मे रोजी त्यांचं निधन झालं.
प्रोटोकॉलचं पालन करत प्रेमनाथ यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पण त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह नदीत टाकून दिला”.पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
रामदेवबाबा विरोधात उद्या डॉक्टर्स पाळणार 'काळा दिवस', एफआयआर दाखल, व्हॉट्सअॅपवरील डीपीही ब्लॅक ठेवणार
https://t.co/onebOQqZHD— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021