नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) वाद सुरू आहे. ॲलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात मंगळवार, 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा ‘काळा दिवस’ पाळण्याचे ‘आयएमए’ने घोषित केले आहे.
आला हो आला! स्कायमेट म्हणतं मान्सून आला ! , स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यामध्ये चांगलीच जुंपली https://t.co/2ReWsz0tnh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
योगगुरू रामदेवबाबा यांनी अॅलिओपॅथीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशननंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने रामदेवबाबांना नोटीस बजावली आहे. आता फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने उद्या मंगळवारी 1 जून रोजी देशभर काळा दिवस पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तसेच व्हॉट्सअॅपवरील डीपीही ब्लॅक ठेवणार आहेत, असं फोर्डाचे अध्यक्ष डॉ. मनिष यांनी सांगितलं. उद्या कोरोना ड्युटीवर असेलेले सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ पीपीई किटवर काळी पट्टी लावून काम करतील. तसेच व्हॉट्सअॅप डीपीही ब्लॅक ठेवतील, असंही ते म्हणाले.
भारताची कँथरिन द ग्रेट एलिझाबेथ – मार्गारेट, पेशवाईला खरमरीत पत्र लिहणा-या 'राजमाता' (ब्लॉग)https://t.co/NLL6PQ3qHJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर उद्या 1 जून रोजी काळा दिवस पाळणार आहेत. उद्या सर्व डॉक्टर रामदेवबाबांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. याप्रकरणी बाबा रामदेव यांनी ‘जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी’ अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धती हा मूर्खपणा व दिवाळखोर विज्ञान असल्याचे म्हटले होते. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही ॲलोपॅथी डॉक्टर्सना विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू ॲलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते.
महाराष्ट्र लॉकडाऊन – ठाकरे सरकारची नियमावली वाचा विस्तृतपणे https://t.co/pqHofEXKfR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
दरम्यान, आयएमएचे बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसीचे खासदार डॉ. शांतनू सेन यांनी रामदेवबाबांवर एफआयआर दाखल केला आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आधुनिक औषधांनी कोरोना पीडितांचा मृत्यू होतोय असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही दहा हजार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गंभीर गुन्हा आहे. रामदेव बाबा आधुनिक उपचार पद्धतीची बदनामी करत आहेत. एकीकडे डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांना वाचवत आहेत. देशाची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचा सन्मान केला पाहिजे. मात्र रामदेव बाबा त्यांना बदनाम करत असल्यानेच गुन्हा दाखल केला आहे, असं सेन यांनी सांगितलं.
संवाद धनगर बांधवांशी…जागर धनगर आरक्षणाचा #Holkar #अहिल्यादेवी #surajyadigital #जयंती #सुराज्यडिजिटल #चौंडी #पुण्यश्लोक #होळकर #अभिवादन #Rajmata #गोपीचंदपडळकरhttps://t.co/EiIjqxKd1A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021