राजमाता अहिल्याराणी होळकर जंयत्ती विशेष
एक लाँरेन्स नावाचा इंग्रज लेखक लिहुन ठेवतो की अहिल्याराणी यांच नेतृत्व एवढं मोठं आहे की त्यांची तुलना रशियाची राणी कँथरिन , इग्लंडची राणी एलिझाबेथ आणी डेन्मार्क ची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. म्हणजे जागतीक क्रांतीच्या तीन महाराण्या यांच्याशी तुलना परदेशी लेखक करतोय पण येथील पेशवाईला स्वदेशी राजमाता का चालत नाही यावर संशोधन होणे गरजेचे आहे. यावर लेखन , प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यांचा खरा दैदिप्यमान इतिहास समोर येणं गरजेचं आहे यातुन अनेक महिलांना प्रेरणा मिळेल हे आज जयंत्तीच्या निमीत्ताने नमुद करावे वाटते.
राजमाता अहिल्याराणी होळकर यांची जयंत्ती जवळ येताच कार्यकरत्यांना यांची आठवण येते. पण यांच्या तेजस्वी व ओजस्वी पराक्रमी इतिहासाला खरचं आम्ही प्रकाशात आणु शकलो का तर नाही. अहिल्याराणी यांचा इतिहास पराक्रमी तर होताच पण प्रजेला न्याय देण्यासाठी प्रचंड न्यायप्रिय व प्रजाहितदक्ष होता. अहिल्याराणी यांचा जन्म माणकोजी शिंदे यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावात झाला. त्या आठ वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह झाला. मराठा स्वराज्यातील मावळा प्रांताचे जहागीरदार असलेले मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव होळकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याराणींना स्वता युध्दनिती , राजनिती , समाजकारण , शस्त्र पारंगत केले होते. सगळं काही आनंदात चालले होते. अहिल्याराणी होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे 1754 साली कुम्हेर च्या लढाईत धारातिर्थी पडले. काही दिवसातच सासरे मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. राज्यात कर्ताकर्वीते दोन लढवय्ये पुरष गेले.
प्रजा संकटात पडली. शत्रुंनी डोळे वर करुन पाहायला सुरु केले. अहिल्या राणी होळकर सिहांसनावर बसण्यासाठी पेशवाईने विरोध केला. तुम्ही स्त्री आहात तुम्हाला मनुस्मृतीनुसार सिहांसनावर बसण्याचा अधिकार नाही. पेशवाईची आग मस्तकांत गेली होती. एक स्त्री राज्यकारभार पाहणार होती हे पेशव्यांना कदापी मान्य नव्हते. पण प्रचंड विरोध झुगारुन अहिल्याराणी होळकर यांनी सिहासंनावर बसुन राज्यकारभार पाहण्यास सुरवात केली. युध्द व लढाईच्या अनेक प्रसंगी स्वता अहिल्याराणी मैदानात ऊतरत होत्या. तुकोजी होळकर दत्तक पुत्र यांना त्यांनी सरसेनापती केले. रोज जनतेच्या अडीअडचणी समजुन घेऊन त्यांचा निपटारा करणे हे रोजचेच होते.
अहिल्याराणी होळकर यांनी शत्रुवर एेवढी जरब बसवली होती की मावळा प्रांतावर अाक्रमण करायला कोणीही धजावत नव्हते. त्यांच्या काऴात अनेक घाट बांधले. शिवाजी महाराज , राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा मोठा पगडा त्यांच्या डोक्यावर होता हे दिसुन येते. पती निधन झाल्यानंतर अहिल्या सती गेल्या नाहीत अनेक गोष्टीत जिजाऊंच्या विचारांचा वसा व वारसा यांच्यावर दिसुन येतो. पेशवाईच्या खाईतुन जनतेचम रयतेचं शेतकऱ्यांच कल्याणकारी राज्य निर्माण करित होत्या. अनेक अंध्दश्रध्दा त्यांनी बंद केल्या. त्याकाळी दरबारात येताना महिलांनी पडदा पाडुन यायची पध्दत होती. हि पध्दत स्वता अहिल्या राणींनी बंद केली.
अहिल्याराणी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी 1765 साली अहिल्या राणींना एक पत्र लिहले होते. त्याक मल्हारराव असा ऊल्लेख करतात की चंबळ पार करुन ग्वाल्हेर येथे जावा , तेथे तुम्ही चार पाच दिवस मुक्काम करु शकता , तुम्ही मोठे सैन्य ठेवु शकता , त्यांच्या शस्त्रांसाठी योग्यरितीने तजबिज करा . कुच करताना मार्गावर सुरक्षा चौक्या नेमाव्यात. या पत्रातील आशयावर हे स्पष्ट होते की मराठा साम्राज्याच्या जहागिर संभाळणाऱ्या अहिल्याराणीवर किती मोठी जबाबदारी देऊन किती मोठा विश्वास स्वता सरदार मल्हारराव होळकर दाखवत होते. यातुन हे स्पष्ट होते की अहिल्याराणी युध्दकलेत किती पारंगत होत्या. जेव्हा पतीचे निधन झाले त्याच्या काही दिवसानंतरच सासरे मल्हारराव यांचे देखील निधन झाले. त्याच काळात स्वराज्यावर पेशवाईची काळी नजर पडली आणी सिंहासन खाली करण्यास अहिल्यांना सागिंतले. पण पेशवाईला घाबरणारी हि रणरागिनी नव्हती.
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #surajyadigital #अभिवादन #अहिल्यादेवी #पुण्यश्लोक #होळकर #जयंती #सुराज्यडिजिटल #Rajmata pic.twitter.com/lMNeGY7WUC
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पेशवाईला लेखी पत्र लिहीले आणी त्यात जाहिर पणे सागिंतले पेशवांनो लक्षात ठेवा, हे स्वराज्य मावळ्यांनी आणी माझ्या बापझाद्यांनी तलवारीच्या पाताच्या जोरावर आणी बुध्दीच्या क्षमतेवर शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांच स्वराज्य निर्माण केले आहे. जर यावर वाईट नजर करुन चाल करुन याल तर लक्षात ठेवा आजपर्यंतचे तुमचे पराभव हे पुरषांकडुन झाले असतील पण येथुन पुढचा पराभव हा माझ्यासारख्या स्त्रीकडुन होईल अशी जाहिर धमकी पेशवाईला अहिल्या राणी होळकर यांनी दिली
हा इतिहास समोर येणं गरजेचं आहे. एक स्त्री असुनही एवढा धाडसी इतिहास रचणाऱ्या अहिल्याराणींना ऊजेडात आणण्यासाठी यांची जयंत्ती दारु पिऊन नाचुन करण्यापेक्षा व्याख्याने प्रबोधन करुन वाचुन साजरी करुया.
मध्यप्रदेशमध्ये सध्या जे आय.टी शहर म्हणुन ओळखले जाते ते देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणुन आज त्या शहराची ओळख आहे. ते इंदोर नावाचे शहर स्वता अहिल्याराणी यांनी वसवले आहे. एका छोट्या खेड्याला मोठं करण्याचं काम त्याच काळात केले आहे. 1996 साली इदोर मध्ये अहिल्याराणी होळकर यांच्या नावाने देशभरातील समाजिक कार्यासाठी पुरस्कार यांच्या नावे दिला जातोय. इंदोर विमानतळाला व विद्यापिठाला अहिल्याराणी होळकर यांचे नाव आहे.
जगभरातील अनेक नामवंत लेखक तसेच इतिहासकारांनी अहिल्याराणी होळकर यांच्या बद्दल गौरवऊदगार काढले आहेत. ” डिस्कव्हरी आँफ इंडिया च्या पान नंबर 304 वर जवाहरलाल नेहरु म्हणतात अहिल्याबाई होळकर एक योग्य प्रशासक व संघटक होत्या त्यांनी पेशवाईच्या जुलमी काळात देखील आयुष्याची सत्तर वर्ष संघर्षांत काढली. त्यांनी कायद्याचे राज्य आणले. ज्या प्रमाणे पुरषांमध्ये अकबर हा ऊत्तम राज्यकर्ता होता त्याच प्रमाणे स्त्रीयांमध्ये ऊत्तम राज्यकर्ती म्हणुन अहिल्याराणी होळकर आहेत असे अ मेमाँयर आँफ सेंट्रल इंडिया च्या पान.नं. 485 वर लिहले आहे. ” …तर जागतिक दर्जाचे इतिहासकार लेखक जाँन किय म्हणतात की अहिल्याराणी होळकर या तत्वज्ञानी राणी होत्या. त्यांनी कधीच होमहवन , सत्यनारायण , ऊपास-तपास , आणी अघोरी प्रथांना थारा दिला नाही. त्या विज्ञानवादी होत्या. त्यांनी एका हातात तलवर घेतली तर दुसऱ्या हाताने सिहासंनावर बसुन न्यायनिवाडा केली. त्यामुळे या तत्वज्ञानी होत्या. जर जगभरातील अनेक इतिहासात ही नोंद आहे तर मग आमच्या भारतीय इतिहासात अशा कर्तृत्ववान स्त्रीला जागा का मिळत नाही. हि शोकांतिका आहे.
अहिल्याराणी होळकर या महान अशा कँथरिन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट यांच्यासारखी तत्वज्ञानी राणी स्मृतिदिनाच्या निमीत्ताने इतिहासाला जगासमोर आणावी ह्यासाठीच हा लेखन प्रपंच केला आहे.
* हर्षल बागल
मो.नंबर – 86 98 765 843
(लेखक हे पत्रकार तसेच व्याख्याते आहेत)