चंदीगड : पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीआधी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात मागील लोकसभा निवडणुकीपासून गटा-तटाचं राजकारण पाहायला मिळत आहे. यामुळे हायकमांडला यात हस्तक्षेप करावा लागत आहे. हायकमांडनं पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. हे सर्व 25 आमदार दिल्लीत 3 सदस्य असणाऱ्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहे.
विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा टीझर https://t.co/khfmh5tbOf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
मागील काही महिन्यापासून काँग्रेस पक्षात गटबाजी पाहायला मिळत आहे. सलग तीन वर्षात काँग्रेसने तीन राज्यं गमावली आहेत. आता आणखी एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीआधी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
पुलावरून मृतदेह नदीत फेकला, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ https://t.co/cOOJEkvxSs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होताना पाहायला मिळत आहेत. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू झाला आहे. पंजाब राज्य हातातून जाण्याआधी काँग्रेस हायकमांडने हालचाली सुरू केल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस हायकमांडनं पक्षाच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. हे सर्व आमदार 3 सदस्य असणाऱ्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहे.
या समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी 25 आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. अमरिंदर सिंग समर्थक आणि नवज्योत सिंग सिद्धू समर्थक दोघेही दिल्लीत आहेत. त्यामुळे या आठवड्यात या प्रकरणावर मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीपासुन पंजाबमध्ये गटाचं राजकारण पाहायला मिळत आहे. पण आता गटातील राजकारणाला वेग आल्यानं हायकमांडला यात हस्तक्षेप करावा लागत आहे.
सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्यास कोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांवर ठोठावला 1 लाखांचा दंडhttps://t.co/rG7163tvFt
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
दरम्यान, कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दुसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीची पाठराखण केली होती. तेव्हापासून हा वाद वाढला होता.
फडणवीस शरद पवारांना अचानक घरी जावून भेटले, चर्चांना उधाण, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
https://t.co/gpgdrzq9Vd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021