नवी दिल्ली : मोदी सरकारने नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ सभासदांना दुसऱ्यांदा भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रकमेतून आगाऊ रक्कम काढता येणार आहे. महामारीच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (PMGKY) ही आगाऊ रक्कम काढण्याची विशेष तरतूद करण्यात आली. दरम्यान, सहा कोटी नोकरदारांना यामुळे फायदा होणार आहे.
काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटणार?; 25 आमदार दिल्लीत दाखल https://t.co/4SjnZfiXkY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा देशातील नागरिकांची आर्थिकस्थिती बिघडवली आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठनेनं (EPFO) आपल्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, लाभार्थ्यांना दुसऱ्यांदा आपल्या पीएफ अकाउंटमधून नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्सचा रक्कम काढता येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणे : मद्यप्रेमींसाठी खुशखबर दारुची दुकाने आठवड्याचे सातही दिवस सुरु https://t.co/jTO54qiiSB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मार्च 2020 मध्ये देखील सरकारनं ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेंतर्गत (PMGKY) ईपीएफओ ग्राहकांना ॲडव्हान्सची सुविधा दिली होती.
श्रम मंत्रालयानं देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्रासलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा नॉन-रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्स काढण्याची परवानगी दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, खात्यात जमा रक्कमेच्या 75 टक्के म्हणजेच तीन महिन्यांच्या पगाराइतकी (बेसिक पगार आणि महागाई भत्ता) रक्कम खात्यातून काढता येणार आहे.
टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू https://t.co/N50WGZ9c9i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
कोविड-19 अंतर्गत ऑनलाइन दाव्यांवर ऑटो मोडनुसार क्लेम सेटल करण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 72 तासांत पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत. सध्या ईपीएफओचे 6 कोटी खातेधारक आहेत. 1 एप्रिल 2020 पासून 12 मे 2021 पर्यंत 72 लाख कर्मचाऱ्यांनी एकूण 18,500 कोटी रुपयांचा नॉन रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हन्सचा लाभ घेतला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ईपीएफओने सुमारे 1.63 कोटी खातेधारकांना 81,200 कोटी रुपयांचे क्लेम सेटल केले आहेत.
विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा टीझर https://t.co/khfmh5tbOf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021