सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडझोननुसार पुन्हा 15 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाच्या वतीने रात्री उशिरा घेण्यात आला. ग्रामीणमधील रुग्णसंख्या अपेक्षेपेक्षा कमी होत नसल्याने तसेच मृत्यूदर घटत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये 7 ते 11 या वेळेतच फक्त त्यावश्यक सेवा सुरु ठेवले जाणार आहे.
मराठा समाजाकरिता मोठी बातमी, मिळणार दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ https://t.co/rH7wobvcLV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली तरी संचारबंदी कायम राहणार आहे. यामध्ये दुपारी दोननंतर अत्यावश्यक औषधे व हॉस्पिटल व्यतिरिक्त कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. त्यासोबतच रिक्षांना दोन प्रवासी, दुचाकीवर एकजणच असे निर्बंध आहेत. तसेच गर्दी होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर ऐनवेळी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. शनिवार, रविवारी मात्र कडक लॉकडाऊन राहणार आहे. सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून वैद्यकीय व तातडीच्या सेवा वगळून इतर गोष्टींवर निर्बंध असणार आहेत.
कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, संभाजीराजेंची भूमिका अमान्य https://t.co/AeTG81RP41
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
शहरातील लॉकडाऊन 15 दिवस लांबला तरी शंभरकर यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सोबतच आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांनाही बाजारपेठांनुसार एकेरी लाईन (आलटून पालटून एका बाजूने दुकाने) सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या वेळादेखील दुपारी दोनपर्यंतच राहणार आहेत. अर्थात लॉकडाऊनअंतर्गत सर्व दुकाने शनिवार, रविवार पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संभाजीराजेंवर सरकार ठेवतेय पाळत; संभाजीराजेंचा दावा, केंद्र की राज्य उल्लेख नाही https://t.co/01oW9Runvx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
शहरातील अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. या सुविधांव्यतिरिक्त सर्व बाजारेपठेत एकेरी लाईननुसार आलटून-पालटून व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. अर्थात दुपारी दोननंतर सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे. यामध्ये औषध दुकाने, हॉस्पिटल, वृत्तपत्र व्यवसाय, शासकीय कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.
कोरोनाची साथ कायम आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांसह सोलापूर जिल्हा रेडझोनमध्ये आला आहे. त्यानुसार शासनाने पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात शासन निकषानुसार सोलापूर जिल्हा क्षेत्रात कोव्हिड पॉझिटिव्हिटी दर 8.92 टक्के म्हणजेच 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिलतेसंदर्भात जिल्हाधिकार्यांना याबाबत निर्णयाचे अधिकार दिले होते.
बारामती जिल्हा परिषद सदस्येच्या पतीवर गोळीबार, परिसरात खळबळ https://t.co/u30lXqfSvg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तूदेखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येणार आहेत. दुपारी दोननंंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या जाण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. कोरोनाविषयक कामे करणार्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास या पेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी घ्यावी लागणार आहे.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवून देण्याचे अथवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना असणार आहेत.
पुणे : मद्यप्रेमींसाठी खुशखबर दारुची दुकाने आठवड्याचे सातही दिवस सुरु https://t.co/jTO54qiiSB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
* ग्रामीणमध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरु
ग्रामीण भागातील दुकाने मात्र अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे गेली दहा दिवस ग्रामीण भागातील अडचण काहीसी दूर होणार आहे. दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येणार आहेत. परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल. सर्व खाद्यपदार्थ हॉटेलनाही होम डिलिव्हरीची मुभा आहे.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्याचा मृत्यूदर सर्वाधिक असून पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यात रूग्णवाढ मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कडक लॉकडाउन उठविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद https://t.co/G9JMpoDhFI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021