जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता आज (मंगळवार) फडणवीस जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. विशेष म्हणजे फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. पण अजूनही खडसे यांच्या मनात, हृदयात कुठेतरी भाजपच प्रेम दडलय असे म्हणायला हरकत नाही. तसा प्रकारच समोर आलाय.
आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर https://t.co/gRjoDkxtEq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात जाऊन रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यावेळी ते जळगावातील रुग्णालयाच्या पाहाणीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील होते.
यांनी ज्यावेळी रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे यांचा फोटो आहे.
📍मुक्ताईनगर
नुकसानीची तीव्रता पाहता आता सफाई, नव्याने रोपणी करावी लागणार आहे. शेतकर्यांना सारे काही नव्याने करावे लागणार आहे.
अनेक शेतकर्यांनी सांगितले की, करप्यावरील औषध सुद्धा मिळत नाही. राज्य सरकारने ते दिले पाहिजे, जे आपल्या काळात दिले जात होते. pic.twitter.com/1ML0kQWJAv— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 1, 2021
त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं आहे. परंतु, खासदार रक्षा खडसे या अजुनही भाजपमध्येच आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी गेले.
फडणवीस शरद पवारांना अचानक घरी जावून भेटले, चर्चांना उधाण, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
https://t.co/gpgdrzq9Vd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफानी हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला अतोनात त्रास दिला, अक्षरश: पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं असा आरोप त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केला होता.
“काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,” असं खडसे म्हणाले होते.
कोविडमुळे ऑपरेशन लोटस होणार नाही, आम्हाला वेळ नाही, कोरोनानंतर बघू – देवेंद्र फडणवीस #political #surajyadigital #DevendraFadnavis #operations #LOTS #सुराज्यडिजिटल #अॉपरेशनलोटसhttps://t.co/RzJ1rjiZIc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले. यात केळीच्या बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार माजी मंत्री एकनाथ खडसे हे काही महिन्यांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खडसेंचा हा निर्णय भाजपसाठी धक्कादायक होता. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप खडसे यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतरही त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
शिक्षणमंत्री पोखरियाल एम्स रूग्णालयात दाखल, बारावीच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?https://t.co/3UXZ3bZS13
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
* भाजपकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
राज्यात सध्या मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तर, खासदार संभाजीराजे भोसले हे देखील आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते तडक खडसेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांची ही भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर भाजपकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
लस घेतल्यानंतर अँटीबॉडी बनल्याच नाहीत, पुनावालांविरोधात तक्रार https://t.co/GZSAw5XDTb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021