मुंबई : तंत्रज्ञानाला जगात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. भारतातही काही संस्थांनी याला विरोध केला आहे. तर अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 5G पासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे पर्यावरणाला किती धोका आहे, याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जुही चावलाने केली आहे.
मोठा निर्णय; 6 कोटी लोकांना दुसऱ्यांदा काढता येणार रक्कम https://t.co/MHlCTqIDOq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
अभिनेत्री जूही चावलाने 5G नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत जूहीने 5G नेटवर्कला विरोध दर्शवला आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं म्हणत जूही चावलाने हे पाऊल उचललं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू https://t.co/N50WGZ9c9i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
अभिनेत्री जूही चावला सध्या सिनेमांमध्ये झळकत नसली तरी पर्यावरण रक्षणासाठी जूही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे म्हणजेच विकिरणांमुळे फक्त मानवी जीवनावरच नाही तर प्राणी आणि वनस्पतींवर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो असं म्हणत जूहीने ही याचिका दाखल केलीय.
24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद https://t.co/G9JMpoDhFI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
जूही चावलाची याचिका न्यायमूर्ती सी हरि शंकर यांच्यासमोर मांडण्यात आली होती. ही याचिका त्यांनी दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवली असून उद्या 2 जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जर दूरसंचार कंपन्यांना 5G नेटवर्कसाठी परवानगी दिली तर या रेडिएशनच्या परिणामामुळे प्रत्येक मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींना धोका निर्माण होऊ शकतो असा दावा जूही चावलाने केला आहे.
सोलापुरात बाजारपेठांनुसार 7 ते 2 एकेरी लाईन सुरु, शनिवार – रविवार सर्व बंद; ग्रामीणमध्ये 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरु https://t.co/ALKnikPY4g
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
* दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं
विकिरण पृथ्वीवरील पर्यावरणाचं असं नुकसान करतील जे पुन्हा कधीच भरून काढणं शक्य नसेल. विकल दीपक खोसला यांच्या मदतीने ही याचिका जूही चावलाने दाखल केलीय. 5G नेटवर्कमुळे लोकांचा फायदा होईल. यामुळे लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होणार नाही हे दूरसंचार कंपनीने स्पष्ट करावं, असं याचिकेत नमूद करण्यात आलंय. शिवाय 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे महिला, लहान मुलं, नवजात बालकं तसेच वनस्पती आणि पर्यावरणातील सर्व प्रकारच्या सजीवांवर विकिरणांचा प्रभाव होणार नाही हे दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं, असं या याचिकेत म्हंटलं आहे.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा घेणं अशक्य, 12 वी परीक्षा केंद्र सरकार करणार घोषणा #surajyadigital #10th #12th #सुराज्यडिजिटल #केंद्रसरकार #maharashtra #अशक्य #घोषणा pic.twitter.com/k5UoUrbcFj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021