नवी दिल्ली : कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये 80 टक्के प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, त्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी साध्य करण्यात आली. त्यामुळे येथील सर्व निर्बंध हटवण्यात आले. येथील नागरिकांना कुठेही गेल्यास लस घेतल्याचा पुरावा द्यावा लागत नाही.
लस घेतल्यानंतर अँटीबॉडी बनल्याच नाहीत, पुनावालांविरोधात तक्रार https://t.co/GZSAw5XDTb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अशात काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. भारतासारख्या देशात कोरोनाची दुसरी लाट असून दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अशात जगात असेही काही देश आहेत ज्यांनी कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवले आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन देशांनी हे यश मिळवलं आहे. ब्रिटनचा या देशांमध्ये समावेश होतो. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये काल मंगळवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही.
विशेष म्हणजे जूलैनंतर पहिल्यांदाच असं घडत आहे. 2020 वर्षाच्या सुरुवातील कोरोना विषाणूने ब्रिटनमध्ये अक्षरश: हाहाकार माजवला होता. हजारो लोकांचा मृत्यू होत होता. पण, ब्रिटन सध्या विषाणूवर नियंत्रण मिळवता दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महामारी सुरु झाल्यानंतर 28 दिवसांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिकांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यूरोपमधील कोरोनाने सर्वाधिक प्रभावित देश ब्रिटन ठरला होता.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 45 लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी देशात केवळ एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, त्यानंतर काल मंगळवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे नक्कीच ही एक समाधानाची बातमी आहे. याआधी 30 जूलैला ब्रिटनमध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले की, नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. डिसेंबर महिन्यापासून लसीकरण करण्याच्या निर्णयाला यश मिळताना दिसत आहे. असे असले तरी त्यांनी खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
आपण अजून विषाणूला हरवलं नाही. त्यामुळे लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असं मॅट हॅनकॉक म्हणाले. दरम्यान, ब्रिटनने अर्थव्यवस्था अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. लवकर लसीकरण सुरु करण्याचे चांगले परिणाम देशाला मिळत आहेत. आतापर्यंत 2.5 लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असले तरी भारतात आढललेल्या डेल्टा व्हॅरिएंटमुळे ब्रिटनमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.