हन्नूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री परिसरात आज बुधवारी दुपारी तीन ते चार दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे परिसरातील शेताच्या बांधात पाणी साचले. जोरदार वाऱ्यामुळे दर्गनहळळीत झाडे उन्मळून पडले आहेत.
'आयुक्त चले जाओ'चा नारा, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे उपोषण, उद्यापासून व्यापारचक्र सुरू होण्याचे संकेत !, अजित पवारांनी बोलावली आज बैठक https://t.co/7opvAdq7cJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
धोत्री परिसरातील दर्गनहळळी वडगाव संगदरी परिसरात पाऊस झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळी भुईमूग, टोमॅटो, वांगी, मिरची आदी फळभाज्यांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस https://t.co/Y9ciMbkK8K
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागतीचे कामे पूर्ण केली आहेत. यामुळे पेरणीसाठी पाऊस उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटले असून यामुळे शेतातील माती वाहून गेली आहे. धोत्री ते सोलापूर रस्त्यावर पाणी साचले. पेरणी करण्यासाठी अजून दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून, मातंग महिलांना विष्ठा उचलायला लावलेले प्रकरणhttps://t.co/lfqBE5EjEQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021