नवी दिल्ली : “सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आज सुद्धा अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील,” असा विश्वास व्यक्त केलाय. हा विश्वास मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी यांनी व्यक्त केलाय.
लसीअभावी मुंबईत आज कोरोना लसीकरण बंद #surajyadigital #coronavaccin #mumbai #मुंबई #सुराज्यडिजिटल #Stop pic.twitter.com/q6IvIh5Opk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थांची कमतरता असल्याने अनेकांना आपल्या नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेला औषध तुटवडा, ऑक्सजिन तुटवडा आणि बेड्सच्या तुटवड्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्यांकडून केला जात आहे. त्यामुळेच या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात आहे.
खाद्यतेलावरील आयात करात कपातीचा निर्णय पुढे ढकला https://t.co/BYNV1T5S7D
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
मात्र मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी या व्यक्तीने, “सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आज सुद्धा अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील,” असा विश्वास व्यक्त केलाय.
* कोण आहेत चोक्सी ?
सूरतमध्ये राहणाऱ्या मेहुल चोक्सीने पंतप्रधान मोदींवर पीएचडी केली आहे. “लीडरशीप अंडर गव्हर्मेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी”, हा विषय घेऊन मेहुल यांनी संशोधन केलं आहे. या संशोधनामध्ये त्यांनी साडेचारशे जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग होता. मेहुल यांनी मोदींच्या नेतृत्वासंदर्भातील काही समान प्रश्न या मुलाखतींमध्ये विचारले होते. या संशोधनादरम्यान मोदींची भाषणं ही जनतेला खूप आकर्षक वाटतात असं मेहुलला दिसून आलं.
भारतातील लोकांचं 'कंडोम' वापरण्याचं प्रमाण कमी, अहवालातील धक्कादायक खुलासेhttps://t.co/tVJ9YE3Sx7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
* संशोधनामध्ये निष्कर्ष काय ?
या संशोधनामध्ये ४८ टक्के लोकांनी मोदी राजकीय मार्केटींगमध्ये उत्तम असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख खाली जाताना दिसत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली- पश्चिम बंगालसारख्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याचं पहायला मिळाला नाही. यासंदर्भात बोलताना मेहुल यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाची जगभरामध्ये चर्चा झाल्याचं सांगतात. दुसऱ्या लाटेच्या व्यवस्थापनामध्ये मात्र नक्कीच काही उणीवा होत्या. त्यामुळे लोकांनी आपला संताप उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर आणि सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला. मात्र असं असलं तरी मोदींच्या प्रतिमेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा मेहुल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय. आजही मोदींवर लोकांना विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीचा आगामी निवडणुकांमध्ये फार फरक पडणार नाही, असं मेहुल यांनी सांगितलं.
सिंगलच बरं आहे, काहीही झालं तरी लग्न नकोच – तुषार कपूर https://t.co/JXQJQwmsuj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021