सोलापूर : पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपुरात मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना दीड वर्षांपासून घरात डांबून ठेवण्यात आले. या काळात त्याने आपल्या पत्नी आणि मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांची निर्भया पथकाकडून सुटका करण्यात आली. आरोपी पती दत्तात्रय बर्डे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
18 जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील नाही; उद्धव ठाकरेंचा आदेश, महाविकास आघाडीत निर्णयावरुन गोंधळ https://t.co/WsCEOuvM3i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह तीन मुलींची निर्भया पथकाकडून सुटका करण्यात आली आहे. मुलासाठी आजही असे अतिशय धक्कादायक प्रकार घडणं चिंताजनक आहेत. मुलगा होत नाही म्हणून आरोपी दत्तात्रय बर्डेने पंढरपूर शहरातील झेंडे गल्लीतील एका घरात दीड वर्षापासून पत्नीसह तीन मुलींना डांबून ठेवलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निर्भया पथकाला या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुले, गणेश इंगोले, अरबाज खाटीक, कुसुम क्षीरसागर, निता डोकडे, चंदा निमगिरे आणि अविनाश रोडगे यांनी साध्या वेशात घटनास्थळी जाऊन कारवाई करत त्यांची सुटका केली.
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात लॉकडाऊन हटवला, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवला जाणार, लॉकडाऊन संपला, आता नवीन नियमhttps://t.co/FXNhb8AXEO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
यावेळी संबंधित महिला आणि तिन्ही मुली अत्यंत घाबरलेल्या खोलीतील कोपऱ्यात बसलेली दिसून आली. दीड वर्षांपासून समाजापासून दूर एका खोलीत डांबून ठेवल्याने ही महिला आणि मुली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
World Bicycle Day 2021: सायकलिंगचे 'हे' आहेत फायदे #surajyadigital #जागतिक #WorldBicycleDay #सायकलदिन #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nViOI8g3kU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021