मुंबई : महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन हटवण्यावरुन लोकांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील लॉकडाऊन चार जूनपासूनच शिथिल केल्याची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने असा निर्णयच झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकांमधील संभ्रम पुन्हा वाढला आहे.
* लॉकडाऊन हटवणार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील वडेट्टीवार
18 जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार, अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र आता त्यांनी घुमजाव केला आहे. 18 जिल्ह्यात लॉकडाऊन हटवण्यासंदर्भात तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत जे निर्बंध आधी लागू करण्यात आले होते, तेच कायम राहणार आहेत.
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात लॉकडाऊन हटवला, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवला जाणार, लॉकडाऊन संपला, आता नवीन नियमhttps://t.co/FXNhb8AXEO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
* काय सुरू, काय बंद ? ठाकरे सरकारला सवाल
काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 18 जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील होणार असल्याची घोषणा केली. मात्र, थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सवाल केला आहे. काय सुरू, काय बंद ? कुठे आणि केव्हापर्यंत ? लॉक की अनलॉक ? पत्रपरिषद की प्रेसरिलीज ? अपरिपक्वता की श्रेयवाद ? असे त्यांनी विचारले आहे.
काय सुरू, काय बंद ❓
कुठे आणि केव्हापर्यंत❓
लॉक की अनलॉक❓
पत्रपरिषद की प्रेसरिलीज❓
अपरिपक्वता की श्रेयवाद❓#Lock #Unlock pic.twitter.com/bZF1AEx9yY— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 3, 2021