नवी दिल्ली : भारतात प्रत्येकाची संध्याकाळ मच्छरांच्या दहशतीत जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, जगात असाही एक देश आहे जिथे एकही मच्छर नाही. उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड देशाची लोकसंख्या कमी असून तेथे केवळ 1300 प्रजातीचे जीव आढळतात. येथे एकही मच्छर सापडणार नाही. संशोधनानुसार आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर नसते. 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. थंड तापमानामुळे आईसलँडमध्ये साप किंवा सरपटणारे प्राणी देखील आढळत नाहीत. याठिकाणी आढळलेला एक डास आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री या प्रयोगशाळेमध्ये संरक्षित ठेवण्यात आलेला आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/HwrsP8REBD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
जगातील अनेक देशांमध्ये डासांची दहशत आहे. भारतात तर आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ डासांच्या दहशतीखालीच असते. डासांमुळे पसरणारे आजार भारतातच अधिक आहेत. पण जगात असे काही देश आहेत जिथे एकही मच्छर शोधून सापडणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणी 1300 प्रजातीचे जीव आढळतात. मात्र यात मच्छर सापडत नाहीत.
ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू, असे करा व्हेरिफिकेशन https://t.co/cVQrnjTlIk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
आईसलँडच्या शेजारीच असलेल्या ग्रीनलँड, स्कॉटलँड, डेन्मार्क या देशांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मच्छर सापडतात. आईसलँडमध्ये मच्छर न सापडणं हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. संशोधनात असं लक्षात आलं आहे की,आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. डासांची अंडी जगण्यासाठी स्थिर पाण्याची आवश्यकता असते. आईसलँडमध्ये -38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे पाणी गोठतं आणि म्हणूनच इथे डास जगू शकत नाहीत. एका संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर याठिकाणी जगणं अशक्य आहे.
भारतातील लोकांचं 'कंडोम' वापरण्याचं प्रमाण कमी, अहवालातील धक्कादायक खुलासेhttps://t.co/tVJ9YE3Sx7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021