श्रीपूर : स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील श्री पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. सुपंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आज शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले.
श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्यांदा हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प उभा केला असल्याचे कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले. ते पांडुरंग कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या सुपंत ऑक्सिजन निर्माण प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी पंढरपूर तालुक्यातील मान्यवर, कारखान्याचे संचालक, कामगार उपस्थित होते.
मुलगा होत नसल्याने पत्नी आणि 3 मुलींना दीड वर्षे ठेवले डांबून, पंढरपुरातील धक्कादायक प्रकारhttps://t.co/tgyLd4eTHb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
आमदार परिचारक म्हणाले, पांडुरंग कारखान्याने दुष्काळ असू द्या, महापुर असू द्या, किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ द्या यामध्ये कारखान्याचे सभासद कामगार धाडसाने पुढे येऊन मदतीचा हात देण्याची भूमिका घेतात, त्यामुळे साखर संघाने आदेश काडण्याअगोदर पांडुरंग कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबत संचालक मंडळाशी चर्चा करून आपण ऑक्सिजन निर्मिती करू शकतो, का याची चाचपणी केली केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर शहरातील सर्व दुकाने चालू, अशी आहे नियमावली https://t.co/KgttAMlNs4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
आज मला सांगायला आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सहकार साखर उद्योगांमध्ये स्किड माऊंटेड पद्धतीचा ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प सुरू झाला असल्याचे जाहीर करून या प्रकल्पातून रोज १०० जंबो सिलेंडर भरतील एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे.
या प्रकल्पास ५५ ते ६० लाख रुपये खर्च आला असून परदेशातून तैवान मधून ४० ते ४५ लाख रुपयांची मशनरी विमानातून मागवण्यात आली.प्रकल्प अवघा आठ तासात उभा करुन सरकारी नियमांची ऑक्सिजनची चाचणी त्या कार्यालयामार्फत केली. हा अॉक्सिजन आरोग्याला योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आज ४ जुन शुक्रवार रोजी घरगुती स्वरूपात सुपंथ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केल्याचे परिचारक यांनी सांगितले.
रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/HwrsP8REBD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. वास्तविक राज्याच्या जडणघडणीत साखर कारखान्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची जबाबदारी कारखान्यांनी नेहमीच घेतली आहे. सुधाकरपंतांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवाराने आपत्तीच्यावेळी नेहमीच धाडसाने मदतीचा हात दिला आहे. तीच परंपरा या माध्यमातून आपण पुढे चालवित असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परिचारक, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकर मोरे, सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे, डॉ. यशवंत कुलकर्णी, प्रशांत देशमुख, संजय व्हरगर, दाजी पाटील, भगवान चौगुले, बाळासाहेब माळी, बाळासाहेब देशमुख, आप्पासाहेब जाधव, हरिभाऊ शिंदे, रोहन परिचारक, प्रणव परिचारक उपस्थित होते.
आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच, महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करून विक्री
https://t.co/EBp7IewEJy— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021