मुंबई : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज (5 जून ) प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. राज्यात आतापर्यंत एकूण 5528834 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी 13659 कोरोना रूग्ण आढळले. 10 मार्च 2021 रोजी आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते.
…तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल : उद्धव ठाकरे https://t.co/MFwfOQMeXp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
राज्यात आज दिवसभरात 13 हजार 659 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 19 हजार 224 इतका झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 88 हजार 027 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्रात आज 300 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत 99 हजार 512 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.71 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 62 लाख 71 हजार 483 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 093 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
महाराष्ट्रात अनलॉकचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे, दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे, तिस-या 10 जिल्हे आणि चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोरोनाविरुद्धचे 'युद्ध' जिंकणार, धारावीत फक्त 'एक' रुग्ण आढळला https://t.co/S6ExPcDITZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
सध्या राज्यातील मृत्यूदर 1.71 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 62 लाख 71 हजार 483 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 19 हजार 224 (16.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती होमक्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 7,093 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
महाविकास आघाडीचा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊनचे निर्बंध
https://t.co/iSVF3cgOZW— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
* राज्यात कोरोनाचे 13,659 रूग्ण आढळले
महाराष्ट्रात आज (5 जून) कोरोनाचे 13,659 रूग्ण आढळले तर 300 रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच 21, 776 रूग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 58, 19,224 वर पोहचली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 99,512 रूग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 55,28, 834 रूग्ण बरे झाले. राज्याचा रिकव्हरी रेट 95.01 टक्के झाला आहे.