नागपूर : दुबईचा गोल्डन व्हिसा मिळालेला अभिनेता संजय दत्त याने नुकताच नागपूर दौरा केला. या भेटीत संजय दत्तने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घरी जावून भेट घेतली. संजय दत्त याने नितीन गडकरी यांना वाकून नमस्कार केला. या भेटीचे देखील फोटो आता समोर आले आहेत.
संजय दत्त याने नागपूर येथील नितीन राऊत यांच्या बेझनबाग निवासस्थानी जाऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली आहे.
अभिनेता @duttsanjay ने नागपुर में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी से शिष्टाचार भेंट की। pic.twitter.com/GyYjmjgHc6
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय दत्त यांच्या सोबतचे फोटो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याने शेअर केले आहेत. नितीन राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड येथील घरी भेट दिली.
Mr. Sanjay Dutt ji, it's a pleasure to have you with us.
He was unable to attend our wedding, so he specially came to greet us.
Thank you so much for your kindness and blessings. pic.twitter.com/sjdHIGdYBC— Kunal Raut (@KunalNitinRaut) June 5, 2021
डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं. लग्न समारंभ २१ फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित केला होता. मात्र करोना संसर्गामुळे हा समारंभ रद्द करण्यात आला होता. लग्नात भेट होऊ शकली नाही, संजय दत्तने नितीन राऊत यांच्या घरी जाऊन नवदाम्पत्याची भेट घेत आशिर्वाद दिले. राऊत यांच्या भेटीचं कारण समोर आलं. मात्र संजय दत्तने गडकरी यांच्या घरी दिलेल्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
चिमणी गिधाडांना भारी पडली ! https://t.co/h5B9CbOkAw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021