मुंबई : मोदी सरकार आणि ट्विटर या दोघात सुप्त संघर्ष, वाद पाहवयास मिळत आहे. या सगळ्या घटनाक्रमावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘चिमणी गिधाडांना भारी पडली ! ‘ असं ट्विट करत सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
चिमणी गिधाडांना भारी पडली! pic.twitter.com/rc8cTAONif
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 5, 2021
केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील या संघर्षावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केलं आहे. ज्यात ट्विटरचा चिमणी असलेला लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचं दाखवण्यात आलं आहे आणि त्यातच ट्विटर हे नाव दिलेलं आहे. या फोटो बरोबरच एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्राकडून नियमांची सक्ती केली जात असतानाच ट्विटरनेही नियमांवर बोट ठेवत, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक ट्विटरने काढून टाकली. ती नंतर पुर्नप्रस्थापितही करण्यात आली. मात्र, त्यावरून बरंच नाट्य रंगलं. यात केंद्राने ट्विटरला अखेरचा इशाराही दिला.
'टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?' https://t.co/9GHH8Tq4Hy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवी नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते. या नियमावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या संघर्ष झाल्याचंही बघायला मिळालं. यासंदर्भात केंद्राकडून ट्विटरला वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे ही अखेरची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री पद नको, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी https://t.co/8rwisqKcDg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021