सोलापूर : कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना आता राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ७ जून पासून महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक उठवलं जाणार आहे. परंतु तत्पूर्वी स्थानिक प्राधिकरणाला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने सुधारित आदेश काढले आहेत.
गुढी उभी करुन शिवराज्याभिषेक दिन #शिवराज्याभिषेक #surajyadigital #chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #shivrajyabhishek #छत्रपती
माढा : पंचायत समिती कुर्डूवाडी येथे शासन आदेशानुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभी गीताने मानवंदनhttps://t.co/xnKtbkVeXd— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
सोलापूर शहर हे दुसऱ्या टप्प्यात असल्याने महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी नवे आदेश काढले यामध्ये आता सोलापूर शहरातील सर्व दुकाने दिवसभर उघडण्याचा निर्णय झाला आहे तसेच इतर काही बाबींसाठी अजून निर्बंध आहेत नेमके काय आहेत महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा आदेश वाचा. सोलापूर महानगरपालिका क्षेत्राकरीता सुधारीत आदेश काढले आहेत.
सोलापूर शहर – उद्या सोमवारपासून सर्व दुकाने नियमितपणे सुरू राहणार, व्यापारी वर्गातून समाधान #solapur #surajyadigital #सोलापूर #सुराज्यडिजिटल #OPEN #solapurcity pic.twitter.com/k68BavoHFM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवाशंकर यांनी आदेशात म्हटलंय की, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आणि देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ७ जून पासून सकाळी ७ ते पुढील आदेश होईपर्यंत शहरातील काही निर्बंध अंशत: हटवण्यात आले आहेत.
सोलापूरचे पालकमंत्री पद नको, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी https://t.co/8rwisqKcDg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
♦ सोलापुरात काय सुरू आणि काय बंद
* अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियमितप्रमाणे
* बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानं नियमितप्रमाणे
* मॉल्स, थिअटर्स, नाट्यग्रृह, सिंगल स्क्रीन ५० टक्के क्षमतेने
* उपहारगृहे(रेस्टॉरंट) ५० टक्के क्षमतेने
* सार्वजनिक ठिकाणं, मोकळी मैदाने नियमितप्रमाणे
* खासगी कार्यालये नियमितप्रमाणे
* खासगी आणि सरकारी कार्यालये १०० टक्के क्षमतेने
* क्रिडा पहाटे ५ ते सकाळी ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९
इनडोअर गेम्स, आऊटडोअर गेम्स पूर्ण दिवस, परंतु प्रेक्षकांना परवानगी नाही
* नेमबाजी नियमितप्रमाणे
* सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने
* विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!#surajyadigital #छत्रपती #Chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #शिवराज्याभिषेक #ShivRajyabhishek pic.twitter.com/dGjGfNTQ8f
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
* अंत्यसंस्कार जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी
* बैठका, निवडणूका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था बैठका ५० टक्के क्षमतेने
* बांधकाम नियमितप्रमाणे
* कृषी विषयक नियमितप्रमाणे
* ई कॉमर्स वस्तू आणि सेवा नियमितप्रमाणे
* जमावबंदी, संचारबंदी जमावबंदी कायम असेल
* जीम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर ५० टक्के क्षमतेने परंतु वेळ निश्चित दिल्यानुसार
* सार्वजनिक वाहतूक सेवा(बस) १०० टक्के क्षमतेने परंतु उभे प्रवासी घेण्यास बंदी
* मालवाहतूक, एकावेळी ३ जणांना परवानगी नियमितप्रमाणे
* खासगी वाहनाने, लांबचा प्रवास, आंतरजिल्हा प्रवास नियमितप्रमाणे सुरू राहील परंतु पाचव्या टप्प्यातून येणाऱ्यांना ई पास बंधनकारक
* उत्पादन क्षेत्रे निर्यात करणारे उद्योग नियमितप्रमाणे
* इतर सर्व प्रकारचे उद्योग नियमितप्रमाणे