सोलापूर / इंदापूर : सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी आहे. नैतिकता आडवी येत असेल तर पालकमंत्री पद नको पण इंदापूर तालुक्याला सिंचनासाठी पाणी योजना आणणारच, असे मत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!#surajyadigital #छत्रपती #Chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #शिवराज्याभिषेक #ShivRajyabhishek pic.twitter.com/dGjGfNTQ8f
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी गैरसमज केल्याने उजनीवरील पाणी योजनेला अडचण आली. मात्र, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी आहे. नैतिकता आडवी येत असेल तर पालकमंत्री पद नको पण इंदापूर तालुक्याला सिंचनासाठी पाणी योजना आणणारच असे मत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. रुई (ता.इंदापूर) येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील,नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ उपस्थित होते.
ठाकरे बंधू एकत्र येणार का? उद्धव ठाकरे म्हणाले… https://t.co/iSTZKdrh7G
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान भरणे म्हणाले, उजनीवरील योजनेबाबत सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकांमध्ये गैरसमज झाला. त्यामुळे अडचण आली. मात्र, नैतिकता असल्याने अडचण होती. आपला इंदापूर तालुका व मुंबईच बरी आहे. सोलापूर जिल्ह्याचा गैरसमज झाल्याने पालकमंत्री महत्वाचे नाही. मला इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न महत्वाचा आहे.
…तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल : उद्धव ठाकरे https://t.co/MFwfOQMeXp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तालुक्याला पाणी योजना मंजूर करुन ती पूर्ण करणारच आहे. तालुक्यातील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून आगामी काही दिवसांत सुमारे ४०० कोटी रुपये रस्ते विकासासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच डिकसळ येथील व निरा नदीवरील दोन पुलांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी, 3 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनामुक्तीचे प्रमाण 95 टक्क्यांवर https://t.co/v3go1qmxQG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021