मुंबई : काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत बिनसल्याचे चित्र आहे. त्यावर वडेट्टीवार यांनी सवाल केल्याची माहिती आहे. ते म्हणाले की, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयांवर बोलतात. परीक्षा होणार की नाही, याविषयी बोलतात. लॉकडाऊन किती दिवस वाढणार, हे देखील सांगतात. मग जो विषय माझ्या विभागाचा आहे, त्याची मी माहिती दिली तर काय बिघडले?”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!#surajyadigital #छत्रपती #Chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #शिवराज्याभिषेक #ShivRajyabhishek pic.twitter.com/dGjGfNTQ8f
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
राज्यात लॉकडाऊन हटवण्याच्या मुद्यावरून महाविकास आघाडीमधील मतभिन्नता चव्हाट्यावर आली. पण, जर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जर शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याबद्दल बोलत असतील तर मी माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर त्यात काय चुकीचं? असा सवाल मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.
गुढी उभी करुन शिवराज्याभिषेक दिन #शिवराज्याभिषेक #surajyadigital #chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #shivrajyabhishek #छत्रपती
माढा : पंचायत समिती कुर्डूवाडी येथे शासन आदेशानुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभी गीताने मानवंदनhttps://t.co/xnKtbkVeXd— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
लॉक-अनलॉक याविषयी शास्त्रीय पद्धतीने नियमावली तयार करण्याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होती. त्यांनी तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाच्यावतीने बैठकीत चर्चेला आला. त्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ही माहिती महाराष्ट्राला देणार होते, असे असताना विजय वडेट्टीवार यांनी परीक्षांच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे सांगतानाही लॉक-अनलॉकची माहिती दिली. त्यावरुन माध्यमांनी वृ्त्त दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना वापरू द्यावेत, जे झाले ते चुकीचे घडले, अशी प्रतिक्रिया दिली.
सोलापूरचे पालकमंत्री पद नको, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी https://t.co/8rwisqKcDg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी राजेश टोपे त्यांच्या विषयाशी संबंधित नसणाऱ्या अनेक गोष्टी बोलतात, त्यांना कोणी काही म्हणत नाही आणि मी बोललो तर त्याचा एवढा गहजब का होतो? असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र विजय वडेट्टीवार यांनी जे सांगितले तेच घडले आहे. त्यापेक्षा वेगळे घडले असते, तर आमच्यात सुसंवाद नाही, असा त्याचा अर्थ निघाला असता, असे सांगून मोठेपणा दाखवत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर बंद? अखेरची नोटीस https://t.co/1d82e8vJfh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: घोषणा करत असता. पण विजय वडेट्टीवार यांनी माहिती जाहीर केल्यामुळे अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली. त्यावेळी वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडत नाराजी व्यक्त केली होती. राजेश टोपे हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. पण ते अनेक विषयांबद्दल बोलतात. त्यांना कुणीही काही बोलत नाही. मग मी बोलल्यानंतर एवढा गोंधळ कशाला? असं सांगत वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021