नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोना लसीकरणाच्या जबाबदारीतून पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना मुक्त केलं आहे. यापुढे देशातील कोरोना लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिलीय. मोदी यांनी आज ऑनलाईन माध्यमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.
पुण्यात भयंकर आग, 18 जणांचा मृत्यू, 15 महिला कामगारांचा समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख https://t.co/cXZKXWxVWy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
त्यावेळी त्यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षाच्यावरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणाही केलीय. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत देशातील गरीबांना मोफत धान्य पुरवठा केला जाणार असल्याचंही सांगितलं.
स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधानांनी देशाच्या लसीकरणासंदर्भातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी मोदींनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातला फरकही दाखवून दिला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना को अब दीपावली तक आगे बढ़ाया जाएगा। महामारी के इस समय में सरकार गरीब की हर जरूरत के साथ उसका साथी बनकर खड़ी है।
यानि नवंबर तक 80 करोड़ से अधिक देशवासियों को हर महीने तय मात्रा में मुफ्त अनाज उपलब्ध होगा। pic.twitter.com/Ospx5R80FT
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021
सध्या देशात आपण भारतीय बनावटीच्या दोन लसी तयार केल्या. जर त्या केल्या नसत्या तर काय झालं असतं याचा विचार करा. आत्ता जर आधीसारखी परिस्थिती असती तर संपूर्ण देशाचं लसीकरण करण्यासाठी ४० वर्षे लागली असती.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातल्या लसीकरण मोहिमेवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारतात जर लसींची निर्मिती झाली नसती तर विचार करा काय झालं असतं…एवढ्या मोठ्या संख्येला आपण लस कशी देऊ शकलो असतो? पोलिओ, कांजिण्या अशा साथींच्या लसी विदेशातून भारतात यायला दशकं लागली होती. पण भारताने एकाच वर्षात दोन लसींची निर्मिती केली आहे.”
21 जून से 18 वर्ष से ऊपर के सभी नागरिकों के लिए भारत सरकार राज्यों को मुफ्त वैक्सीन मुहैया कराएगी।
किसी भी राज्य सरकार को वैक्सीन पर कुछ भी खर्च नहीं करना होगा। pic.twitter.com/VKK3oddw80
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021
त्यांनी देशातल्या वैज्ञानिकांचं आणि शास्त्रज्ञांचं कौतुकही केलं. “आपल्या देशातले शास्त्रज्ञ, लस निर्मिती कंपन्या बड्या देशांच्या तोडीस तोड काम करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत २३ कोटी देशवासियांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लस निर्मितीसाठी सरकारनं अर्थसाहाय्य केलं आहे. त्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, भारतात लस उत्पादक कंपन्यांना सरकारनं संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यापासून सगळी मदत केली आहे. या कंपन्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे”,असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणासह विविध विषयावर लाईव्ह माहिती देताना #surajyadigital #coronavirus #coronavirusindia #PMOIndia #NarendraModi #live #information #कोरोना #vaccinateeveryindian #लसीकरणhttps://t.co/TCcEvcn750
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
“जेव्हा भारताची लस आली तेव्हा काही लोकांनी अनेक माध्यमांद्वारे शंका-कुशंकाना उपस्थित केल्या. लोकांनी लस घेऊ नये यासाठी अफवा पसरवण्यात आल्या. जे लोग अशा प्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांनाही देश बघत आहे. जे लोक अशाप्रकारे लसीवर शंका उपस्थित करत आहेत, अफवा पसरवत आहेत ते आपल्या भोळ्या भाऊ-बहिणींच्या जीवाशी खेळत आहेत”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. तसेच “अशा अफवांपासून सतर्क राहण्याची जास्त आवश्यकता आहे. मी सर्वांना विनंती करतो, लसीबाबत जागृकता वाढवा”, असं आवाहन देखील मोदींनी यावेळी केलं.
पुणे आग – राज्याकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेशhttps://t.co/Zl4t6DCXHH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
“लसींच्या आगामी काळातल्या पुरवठ्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. देशात सध्या सात कंपन्या करोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. दुसऱ्या देशांशी पण लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.