पुणे : पुणे जिल्ह्यातील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे, कुलिंग ऑपरेशन सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान या आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल.पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे.सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणं आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे.यासारख्या घटना भविष्यात घडू नयेत,यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 7, 2021
पंतप्रधान मोदींकडून 2 लाखांची मदत जाहीर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट ये औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला भीषण आग लागली. यात 18 जणांचा मृत्यू झाला. मोदींनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ‘पीएमएनआरएफ’मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची, तसेच या दुर्घटनेतील जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यात भयंकर आग, 18 जणांचा मृत्यू, 15 महिला कामगारांचा समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख https://t.co/cXZKXWxVWy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
पीएम नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दुःख पुण्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट येथील केमिकल कंपनीला दुपारी भीषण आग लागली. यातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन दुःख व्यक्त केलं आहे. ‘महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती ‘शोकभावना’, असं मोदींनी म्हटलं.
महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021
मृतांची संख्या 18 वर पोहोचली पुण्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट येथील केमिकल कंपनीला आज दुपारी आग लागली. यातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. एसव्हीएस असे या कंपनीचे नाव आहे. यामध्ये 37 कामगार काम करत होते. यातील 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही येथे मदतकार्य सुरू आहे. कंपनीच्या भिंती तोडून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.