सांगली : कुत्र्याला वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पट्टीच्या पोहणाऱ्या या तीनही भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन सख्खे आणि एका चुलत भावाचा यामध्ये समावेश आहे. आटपाडी तालुक्यात घाणंद येथे ही घटना घडली. यातील दोन भावांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत पाण्यात आढळल्याचे पाहून या नातेवाईक आणि नागरिकांना आपले अश्रू अनावर झाले. काल बुडाले होते, आज शोधकार्यतून मृतदेह मिळून आले.
प्लॅस्टिकचे 'टोमॅटो' उगवले, नवा व्हायरस; शेतकऱ्यांची वाढली चिंता https://t.co/0IKBYQkLjq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
आनंदा अकुंश व्हनमाने (वय 14), विजय अंकुश व्हनमाने (वय 17) हे दोन सख्खे भाऊ आहेत, तर वैभव लहू व्हनमाने (वय 14) हा त्यांचा चुलत भाऊ आहे. साखळी बंधाऱ्यात बुडालेल्या या तीन मुलांसाठीचे शोधकार्य संपले असून तिन्ही मुलांचे मृतदेह बंधाऱ्यातच सापडले आहेत. सांगलीतील विश्वकर्मा फाउंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे आणि त्याच्या टीमने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, एक मृत तर चार जखमी, पहा व्हिडिओ
https://t.co/CGwCgiPUIH— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. तेथे लगतच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने यांची शेत जमीन आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लगतच कालव्यातून पाणी वाहत जाते. नेहमीप्रमाणे काल रविवारी (ता.6) दुपारी तीन वाजता घरातील कुत्र्याला सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश व्हनमाने आणि वैभव लहू व्हनमाने गेले होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत.
काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद निवळला? बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला ! https://t.co/XqNOcr3Lu2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या जवळ विजय आणि आनंदा यांचे अंगावरचे कपडे आणि चपला सापडल्या. त्यांच्या सोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात आढळला. तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही. कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. तर घटनास्थळावरच बकेट आणि त्याला बांधलेली दोरीही सापडली. त्यावरूनच काहीतरी दुर्घटना घडल्याचा अंदाज बांधला गेला.
लसी वाया जाऊ देऊ नका – पीएम, जम्मू काश्मीरमध्ये 124 व्या वर्षीच्या आजीने घेतली लस #सुराज्यडिजिटल #कोरोना #लस #surajyadigital #coronvaccine #jammukashmir #grandmother pic.twitter.com/7AEQWI8g0R
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलांचा तपास लागला नाही. आज सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा तिन्ही भावाचे मृतदेह आढळून आले.
"कोरोनाला रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते"; ड्रीमगर्ल, खासदार हेमा मालिनींचा खुलासाhttps://t.co/XBq8yjUQqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021