सोलापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचांनी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचाशी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यातील डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधला.
सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकही कोरोना बळी नाही, पण ग्रामीणमध्ये 18 बळी https://t.co/iYwnfvyAzR
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता अक्कलकोटच्या सरपंच दिपाली आळगी, आंधळगाव ता मंगळवेढाचे सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी (ता. मंगळवेढा) वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होते.
डाॅ. व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माझ गाव कोरोना मुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने विविध पंधरा अभियाने दिली. त्यातून आम्ही गावातील सिल्वर ओक स्कुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरमधून बाहेर जाऊ दिले नाही.
यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंटची मानसिक स्थिती चांगली राहिल याकडे लक्ष दिले. मी डाॅक्टर असल्यामुळे मी देखील रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान सुरू केले. यामध्ये आम्ही टेस्टींग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२१ जूनपासून १८ वर्षांहून अधिकच्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण, लोकांनी लस घेऊ नये यासाठी पसरवल्या अफवा https://t.co/kxIEomr3KJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
जिल्हा परिषेदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणीसाठी चांगली मदत झाल्याचे डाॅ. व्यवहारे यांनी सांगितले.
* कोरोनामुक्त गावांना भेटी देणार – स्वामी
सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त सहा गावांना प्रामुख्याने भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे श्री स्वामी यांनी सांगितले. ज्या सरपंचानी यात योगदान दिले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
आज सरपंचाशी झालेल्या महासंवादाच्या कार्यक्रमात कोरोनामुक्तीबरोबर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले ग्रामपंचायतीचे सरपंच यांना प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होण्यासाठी यापूर्वी आवाहन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.
कुत्र्याला वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, सांगलीतील दुर्घटना https://t.co/BXgGnYd89Z
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
* कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख
सीईओ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझा गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले. त्याची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या भाषणात केली होती. जनतेला संबोधत असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा गौरव केला होता. त्यानंतर माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान राज्यात सुरू करणार असल्याचे जाहीर करून शासन निर्णय काढला. सरपंचाशी आज संवाद साधून त्यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख केला. हे अभियान प्रभावीपणे राबविणेचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
प्लॅस्टिकचे 'टोमॅटो' उगवले, नवा व्हायरस; शेतकऱ्यांची वाढली चिंता https://t.co/0IKBYQkLjq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021