सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोलापूरात गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे नागरिकांत दिलासादायक वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख ४७ हजार २९९ कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, जिल्ह्यात ४ हजार १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सोलापूर ग्रामीण मध्ये ३३१ कोरोना रुग्ण आढळले. तर २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Government of Maharashtra started unlock from the Monday throughout the state.. My district is in level 3 (Solapur) … don't no why e-commerce like @Flipkart @amazonIN are showing 'not deliverable '
— Vishal Devalalikar (@vishalDevlalikr) June 8, 2021
हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहरात मागच्या महिन्यापासून कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु, आता हा आकडा कमी होत असताना पाहायला मिळत आहे.
पुणे आग – राज्याकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेशhttps://t.co/Zl4t6DCXHH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान सोलापूरमध्ये गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच १ लाख ४७ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल ४ हजार १३६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुण्यात भयंकर आग, 18 जणांचा मृत्यू, 15 महिला कामगारांचा समावेश, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख https://t.co/cXZKXWxVWy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021
सोलापूर शहरात दिवसभरात फक्त १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये ३३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात २४ तासात १८ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.
२१ जूनपासून १८ वर्षांहून अधिकच्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण, लोकांनी लस घेऊ नये यासाठी पसरवल्या अफवा https://t.co/kxIEomr3KJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 7, 2021