मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून आज मुंबईत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.
या दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई, ठोठावला 6 कोटींचा दंड, अहवालात निष्काळजीपणाचा ठपकाhttps://t.co/vQYd2ei2ZY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी सब-वे पावसाळ्याच्या चार महिन्यात बंद राहणार अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली. मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत आणि जिथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरु राहिल हे पाहण्यास सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईत पम्पिंग स्टेशन्स कार्यरत राहतील आणि साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे यांचा कोरोनाबळी https://t.co/vfnvLx4Lol
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडली आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट सुरु असताना शेतातील झाडाच्या खाली पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. गोपीचंद सुकलाल सनेर (वय 55 वर्ष) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
मोठा गाजावाजा करत सुरु केलेली आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश' https://t.co/yT3Df6CfSt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021