लंडन : जगभरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद झाली होती. याचा सर्वाधिक फटका ब्रिटन आणि अमेरिकेतील वेबसाइटना बसला आहे. ‘वेब होस्टिंग’ सेवा देणाऱ्या फास्टली या कंपनीच्या कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने इंटरनेट बंद पडले होते. दरम्यान, यामुळे फायनान्शिअल टाइम्स, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, रेडिट, स्पुटीफाय, पेपल, शॉपिफाय या बड्या कंपन्या आणि वेबसाईटला बसला आहे.
मोठा गाजावाजा करत सुरु केलेली आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश' https://t.co/yT3Df6CfSt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
मंगळवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या दरम्यान हा इंटरनेट बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. या इंटरनेटच्या तांत्रिक दोषामुळे अनेक वृत्तपत्र तसेच सोशल मीडिया साईट्स यासह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईटसलाही फटका बसला. इतकंच नाही तर ब्रिटची सरकारी वेबसाईटसह फायनान्शियल टाईम्स, द गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्सची वेबसाईट देखील बंद पडली होती.
इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा फटका फायनान्शिअल टाइम्स, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यांच्यासह अनेक मोठ्या वेबसाईट व पोर्टलना बसला. रेडिट, स्पुटीफाय, पेपल, शॉपिफाय या लोकप्रिय वेबसाइटही यामुळे बंद पडल्या होत्या.
सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे यांचा कोरोनाबळी https://t.co/vfnvLx4Lol
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘सीडीएन’ हा इंटरनेटच्या पायाभूत सुविधांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. फास्टली सारख्या कंपन्यांनी जागतिक पातळीवर सर्व्हरचे नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्यामार्फत ते सेवा पुरवितात. स्थानिक ‘सीडीएन’वरील माहिती गोळाकरून ती जागतिक पातळीवर प्रसारित करण्याचे काम फास्टली सारख्या कंपन्यांचे सर्व्हर करतात.
मुंबई, कोकण, पुण्यात येत्या दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा, धुळ्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
https://t.co/bk3pa5Wo8e— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार ॲमेझॉन आणि ट्विच यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या वेबसाइटसह ब्रिटिश सरकारच्या वेबसाइटनाही इंटरनेट ठप्पचा फटका बसला. या सर्व वेबसाइटवर ‘एरर ३०३ सर्व्हिस अनअव्हेलेबल’ असा संदेश दिसत होता.
कशामुळे ही समस्या निर्माण झाली याबाबत लगेच काही सांगणे शक्य होणार नाही. सायबर हल्ल्यामुळे हा प्रकार घडला आहे का, याबाबतही आता सांगता येणार नाही. परंतु, ही समस्या तातडीने सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ‘फास्टली’ कंपनीने म्हटले आहे. साधारण तासाभराने ही सेवा हळूहळू पूर्ववत झाल्याची माहिती आहे.
जीन्स घालाल, विदेशी चित्रपट पाहाल तर मृत्यूदंड https://t.co/5Aq8Nu8S0u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021